Crime : 'बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर...', मेहुणीच्या प्रेमापोटी डॉक्टरने बायकोला झोपेतच दिला मृत्यू, बुलढाणा हादरलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बुलढाण्यात एका गावातील घरात दहा-बारा दिवसांपुर्वीच दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पशू वैद्यकीय चिकित्सक डॉ. गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती. या दरोड्याचं आता बिंग फुटलं आहे.
Buldhana Crime News : राहुल खंडारे, बुलढाणा : बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बुलढाण्यात एका गावातील घरात दहा-बारा दिवसांपुर्वीच दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पशू वैद्यकीय चिकित्सक डॉ. गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती. या दरोड्याचं आता बिंग फुटलं आहे. खरं तर या प्रकरणात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने गजानन टेकाळे यांनी बायकोची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला होता. या घटनेचा उलगडा करण्यात आता पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्याच्या मातोळा तालुक्यातील दाभाडी गावात डॉ. गजानन टेकाळे यांचे कुटुंब वास्तव्यास होते. टेकाळे यांच्या घरी त्यांची बायको आणि मुलगी असा तिघांच छोटं कुटुंब रहात होतं. या तिघांच्या आयुष्यात एका महिलेचे एन्ट्री झाली आणि सर्व उद्ध्वस्त झालं आहे.
त्याचं झालं असं की डॉ. गजानन टेकाळे यांचं त्यांच्याच मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते. या गोष्टीची कल्पना टेकाळे यांच्या बायकोला अजिबात नव्हती. पण मेहुणी भाऊजींच्या या प्रेमसंबंधात बायको अडसर ठरत होती. त्यामुळे मेहुणीने माझ्या सख्या बहिलीला संपवून माझ्याशी लग्न कर अशी अट घातली होती. त्यामुळे मेहुणीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या टेकाळे यांनी बायकोत्या हत्येचा कट रचला होता.
advertisement
त्यानुसार 18 जानेवारीच्या रात्री डॉ. टेकाळे यांनी बायको माधुरी टेकाळे यांच्या एसिडीटीच्या चुर्णामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली.त्यानंतर माधुरी यांना पटकन झोप आली. माधुरी गाढ झोपेत गेल्यानंतर टेकाळे यांनी त्यांच्या तोंड उशीने दाबून त्याचा जीव घेतता. त्यानंतर कपाटातलं सामान अस्ताव्यस्त करून जमिनीवर पाडलं जेणेकरून ही घटना दरोडा वाटेल. त्यानंतर टेकाळे यांनी झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्धाअवस्थेत असल्याचा देखावा केला.
advertisement
सकाळी 19 जानेवारीला ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरोड्याचा तपास सूरू केला होता. या तपासादरम्यान पोलिसांना घरात घुसखोरी केल्याचा कोणता पुरावा मिळाला. ना घरात कोणत्याही अज्ञात व्यक्तीचे ठसे किंवा श्वानपथकाच्या हाती देखील काहीच लागले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर घटनेचा उलगडा करण्याचे मोठं आव्हान होतं.
या दरम्यान पोलिसांनी गजानन टेकाळे यांच्या फोनंमध्ये त्यांचा एका तरूणीसोबतचा फोटो दिसून आला. या फोटोवरून पोलिसांना या घटनेत अनैतिक संबंधाचा संशय आला आणि त्यांनी गजानन टेकाळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीत आपल्या सख्या बहिलीला संपवून माझ्याशी लग्न कर यासाठी डॉक्टरला त्यांची मेहुणी त्रास देत होती, त्यामुळंचे बायकोची हत्या केल्याचे गजानन काळे याने पोलिसांसमोर कबुल केले. या घटनेमुळे डॉक्टरच दरोड्याच बिंग फुटलं. आता पोलिसांनी डॉक्टरच्या मेहुणीलाही अटक केली आहे. या घटनेने बुलढाणा हादरलं आहे.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
February 01, 2025 1:22 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime : 'बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर...', मेहुणीच्या प्रेमापोटी डॉक्टरने बायकोला झोपेतच दिला मृत्यू, बुलढाणा हादरलं


