Buldhana Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला जिवंत पेटवलं, मग...बायकोच्या कृत्याने बुलढाणा हादरलं!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बुलढाण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एका पतीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पतीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Buldhana crime News : राहुल खंडारे, बुलढाणा : बुलढाण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एका पतीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पतीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. रणधीर गवई असे मृतक माजी सैनिकांचं नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मृत पतीच्या पत्नीविरोधात गु्न्हा दाखल केला आहे. या घटनेने बुलढाण्यात खळबळ माजली आहे.
बुलडाणा शहरातील मेहकर तालुक्यातील पाचला येथील रणधीर आणि लता गवई या तारा कॉलनीत विभक्त राहत होते. त्यांचा न्यायालयात वाद सूरू होता. 13 जानेवारीच्या रात्री रणधीर पत्नी लताच्या घरी आले. या दरम्यान रात्री 2 वाजता दोघांमध्ये वाद झाला. या वादातूनच संतापून लताने रणधीर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनी जिवंत जाळलं होतं. त्यानंतर आरडाओरड झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.
advertisement
त्यानंतर स्थानिकांनी पटकन आग विझवत या घटनेची पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी यावेळी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रणधीर यांना उपचाराखातर रूग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांना दुसऱ्या रूग्णालयात हलवण्यास सांगितले गेले होते.यावेळी दुसऱ्या रूग्णालयात उपचार सूरू असताना त्यांची प्राणज्योत माळवली.
विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी रणधीर यांनी पोलिसांकडे जबाब नोंदविला होता. या जबाबात अनैतिक संबंधात अडसर ठऱत असल्याने पत्नीने जिवंत पेटवून दिल्याची माहिती दिली होती. या माहितीच्यी आधारावर पोलिसांनी आरोपी पत्नी लता गवईला ताब्यात घेतले आहे. तसेच तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे. या घटनेने
advertisement
बुलढाण्यात खळबळ माजली आहे.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
January 15, 2025 12:21 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Buldhana Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला जिवंत पेटवलं, मग...बायकोच्या कृत्याने बुलढाणा हादरलं!


