दरोडा टाकायला आले, रक्तबंबाळ करत बापलेकाला संपवलं, शिर्डीतील डबल मर्डरचं गूढ समोर

Last Updated:

Crime in Shirdi: शनिवारी मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास शिर्डी विमानतळाजवळील एका वस्तीतील घरात घुसून काही अज्ञातांनी घरातील तिघांवर जीवघेणा हल्ला केला होता.

News18
News18
हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळाजवळील एका वस्तीत शनिवारी मध्यरात्री बापलेकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शनिवारी पहाटे हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या घटनेचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दरोड्याच्या उद्देशानेच हे हत्याकांड घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी मध्यरात्री नक्की काय घडलं?
शनिवारी मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास शिर्डी विमानतळाजवळील एका वस्तीतील घरात घुसून काही अज्ञातांनी घरातील तिघांवर जीवघेणा हल्ला केला होता. हा हल्ला इतका भयंकर होता की यात बापलेकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृत्यू झाला. तर मयताची आई गंभीर जखमी झाल्या. साहेबराव पोपट भोसले (वय वर्षे 60) आणि मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय वर्षे 30) अशी मयतांची नावे असून साखरबाई साहेबराव भोसले या गंभीर जखमी झाल्या. साखरबाई यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह राहता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलद गतीने तपासाची चक्रे फिरवत सिन्नर पोलिसांच्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील पळसे टोल नाक्यावर सापळा रचून दोन आरोपींना जेरबंद केले आहे.
या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून दरोड्याच्या उद्देशाने हे हत्याकांड केल्याची माहिती दिली आहे. संदीप रामदास दहाबाड, वय 18 वर्षे आणि जगन काशिनाथ किरकिरे, वय 25 वर्षे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
दरोडा टाकायला आले, रक्तबंबाळ करत बापलेकाला संपवलं, शिर्डीतील डबल मर्डरचं गूढ समोर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement