डोळ्यांत मिरचीपूड टाकली, गळ्यावर पाय दिला, प्रियकराच्या साथीने पत्नीने काढला पतीचा काटा, वाचा सविस्तर
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सुमंगला नावाच्या महिलेनं आपल्या प्रियकरासोबत पती शंकरमूर्तीचा खून केला. डोळ्यांत मिरची पावडर टाकून, काठीने मारहाण करत त्याचा मृतदेह...
प्रेम आणि प्रेमाच्या नावाखाली होणारे खून काही नवीन नाहीत. घरातून पळून जाऊन किंवा दुसऱ्यावर प्रेम जडल्याने पत्नी किंवा पतीचा खून करण्याच्या घटना आता नेहमीच्या झाल्या आहेत. अशाच एका धक्कादायक खुनाची घटना कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यात समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करून, त्याचा मृतदेह दूर फेकून दिला.
दोघांनी मिळून केली पतीची हत्या
24 जून रोजी तिप्तूर तालुक्यातील कडाशेट्टीहल्ली गावात ही घटना घडली. शंकरमूर्ती (50) नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांची पत्नी सुमंगला तिप्तूर येथील एका मुलींच्या वसतिगृहात स्वयंपाकीण म्हणून काम करत होती. सुमंगला आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमसंबंधांना शंकरमूर्तीने आक्षेप घेतल्याने, सुमंगला आणि तिच्या प्रियकराने मिळून त्याची हत्या केली.
advertisement
डोळ्यात मिरचीपूड टाकली, पुढे...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीटीव्हीने म्हटले आहे की, सुमंगलाने शंकरमूर्तीच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्याला काठीने मारले. पोलिसांनी सांगितले की, सुमंगलाने त्याच्या गळ्यावर पायही ठेवला होता. शंकरमूर्तीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर, तिचा प्रियकर नागराजु आणि सुमंगलाने शंकरमूर्तीचा मृतदेह एका पोत्यात बांधून, 30 किलोमीटर दूर असलेल्या तुरुवेक्करे तालुक्यातील एका शेतातील विहिरीत फेकून दिला.
advertisement
पत्नीने दिली हत्येची कबुली
शंकरमूर्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या धक्कादायक खुनाचा उलगडा झाला. नोणाविणकेरे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना शंकरमूर्तीच्या शेतातून मिरची पूडचे अंश सापडले. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांना पलंगावरही मारामारीची चिन्हे आढळली. यानंतर पोलिसांनी सुमंगलाची चौकशी केली. त्यांच्या कॉल डिटेल्सचीही तपासणी करण्यात आली. चौकशीनंतर सुमंगलाने गुन्ह्याची कबुली दिली. नोणाविणकेरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या पुढील तपास सुरू आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 01, 2025 3:55 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
डोळ्यांत मिरचीपूड टाकली, गळ्यावर पाय दिला, प्रियकराच्या साथीने पत्नीने काढला पतीचा काटा, वाचा सविस्तर