Crime News: क्लिनिकमधील नर्ससोबतचे प्रेमसंबंध पडले महागात; डॉक्टरने गमावला जीव, काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
हिल्सा येथील पेंदापूर गावात मंगळवारी रात्री डॉक्टर नर्सला नेण्यासाठी आला होता. इथे काही व्यक्तींनी नर्सच्या घरातच गोळ्या झाडून डॉक्टरची हत्या केली
पाटणा 21 सप्टेंबर : प्रेम ही अतिशय सुंदर आणि सुखद भावना असते, असं म्हणतात. मात्र, अनेकदा हेच प्रेम लोकांना मोठ्या संकटातही टाकतं. बिहारमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. बिहारमध्ये एका डॉक्टरला नर्सच्या प्रेमात पडणं चांगलंच महागात पडलं. हे प्रकरण नालंदा जिल्ह्यातील आहे, जिथे हिलसा पोलीस स्टेशन हद्दीतील पेदापूर गावात काही लोकांनी एकामागोमाग तीन गोळ्या झाडून एका डॉक्टरची हत्या केली. या घटनेमागे मयत आणि परिचारिका यांच्यातील प्रेमसंबंध असल्याचं सांगण्यात येत आहे.
बेन पोलीस स्टेशन हद्दीतील कौआकोल येथे राहणारा निरंजन कुमार बेनमध्येच क्लिनिक चालवयचा. दरम्यान, हिलसा येथील पेंदापूर गावातील एक महिलाही या दवाखान्यात काम करत होता, जिच्याशी डॉक्टरचे प्रेमसंबंध होते. हिल्सा येथील पेंदापूर गावात मंगळवारी रात्री डॉक्टर नर्सला नेण्यासाठी आला होता. इथे काही व्यक्तींनी नर्सच्या घरातच गोळ्या झाडून डॉक्टरची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी बिहारशरीफ सदर हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. मृत आरएमपी डॉक्टरची आई माया देवी यांनी सांगितलं की, वर्षा नावाच्या परिचारिकेशी त्याचे अनैतिक संबंध होते, त्यामुळे घरात वाद सुरू होता. या संबंधानाही विरोध करूनही मुलाने ऐकलं नाही आणि नर्सला भेटणं सुरूच ठेवलं. याचाच परिणाम म्हणून त्याला जीव गमवावा लागला.
advertisement
हत्येच्या या घटनेनंतर कुटुंबीयांनी 5 लाखांच्या व्यवहारावरून डॉक्टरचा वाद झाला असल्याचंही सांगितलं. यामुळे डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी नर्स वर्षासह तिचे वडील आणि भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2023 2:36 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: क्लिनिकमधील नर्ससोबतचे प्रेमसंबंध पडले महागात; डॉक्टरने गमावला जीव, काय घडलं?