शेतात गेला अन् घात झाला! 20 माकडांनी शेतकऱ्याची केली भयंकर अवस्था, डॉक्टर देखील वाचवू शकले नाहीत जीव

Last Updated:

Farmer dies due to attack by 20 monkeys : रामनाथ चौधरी हे सकाळी त्यांच्या जनावरांसाठी चारा गोळा करत असताना 20 हून अधिक माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Farmer dies due to attack by 20 monkeys
Farmer dies due to attack by 20 monkeys
Monkeys Attacked on Farmer : गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर असताना आता माकडांचा उल्लठपणा समोर आला आहे. मधुबनी जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत, माकडांच्या हल्ल्यात एका 67 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी शाहपूर गावात ही घटना घडली. रामनाथ चौधरी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे, जे निवृत्त क्लर्क होते.

20 हून अधिक माकडांचा हल्ला

रामनाथ चौधरी हे सकाळी त्यांच्या जनावरांसाठी शेतात चारा गोळा करत असताना 20 हून अधिक माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चौधरी यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली, पण तोपर्यंत ते गंभीर जखमी झाले होते.
advertisement

डॉक्टरांनी मृत घोषित केलं

त्यांना तातडीने मधुबनी सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक प्रमुख रामकुमार यादव यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर, पांडौलचे सर्कल ऑफिसर पुरुषोत्तम कुमार आणि पोलिस स्टेशनचे प्रभारी मोहम्मद नदीम यांनी गावाला भेट दिली.
advertisement

माकडांना पकडण्याची विनंती

दरम्यान, गावकऱ्यांनी या प्रकरणानंतर वन विभागाला या माकडांना पकडण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर बिहारमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
शेतात गेला अन् घात झाला! 20 माकडांनी शेतकऱ्याची केली भयंकर अवस्था, डॉक्टर देखील वाचवू शकले नाहीत जीव
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement