पोराच्या नोकरीसाठी कर्जबाजारी झाला, मध्यस्थीने केली फसवणूक, शेतकरी बापाने उचललं टोकाचं पाऊल!

Last Updated:

Kolhapur News : सकाळी सहा वाजता जनावरांना वैरण आणायला जातो असे सांगून संभाजी पाटील शेताकडे गेले. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा...

Kolhapur News
Kolhapur News
Kolhapur News : मुलाला सरकारी नोकरी लावण्यासाठी 18 लाख रुपये खर्चूनही नोकरी न मिळाल्याने आणि पैसे परत मिळत नसल्यामुळे एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. काखे येथील शेतकरी संभाजी विष्णू पाटील (वय-51) यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संपूर्ण प्रकरण काय?
सकाळी सहा वाजता जनावरांना वैरण आणायला जातो असे सांगून संभाजी पाटील शेताकडे गेले. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले.
संभाजी पाटील यांनी मुलाला सरकारी नोकरी लावण्यासाठी तीन वर्षांपूर्वी कर्ज घेऊन आणि नातेवाईकांकडून पैसे जमा करून वाळवा येथील एका व्यक्तीला 18 लाख रुपये दिले होते. वारंवार पाठपुरावा करूनही मुलाला नोकरी मिळाली नाही आणि पैसे परत मागूनही ती व्यक्ती टाळाटाळ करत होती.
advertisement
या व्यक्तीला भेटण्यासाठी संभाजी पाटील यांना अनेकदा वाळव्याला जावे लागत होते. याचा त्यांना खूप मानसिक त्रास होत होता, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संभाजी पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
पोराच्या नोकरीसाठी कर्जबाजारी झाला, मध्यस्थीने केली फसवणूक, शेतकरी बापाने उचललं टोकाचं पाऊल!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement