सोलापूरच्या डॉक्टरकडून परदेशी तरुणीवर अत्याचार, गोव्यात ICU मध्ये उपचार सुरू असताना अमानुष कृत्य

Last Updated:

सोलापूर येथील रहिवासी असणाऱ्या एका डॉक्टरने विदेशी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीनं आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना तरुणीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं.

News18
News18
सोलापूर येथील रहिवासी असणाऱ्या एका डॉक्टरने विदेशी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीनं आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना तरुणीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. हा सगळा प्रकार गोव्यातील एका खासगी रुग्णालयात घडला आहे. अत्याचारानंतर आरोपी रुग्णालयातून पसार झाला होता. मात्र गोवा पोलिसांनी त्याला सोलापूरमधून बेड्या ठोकल्या आहेत.
वृषभ दोशी असं गुन्हा दाखल झालेल्या २८ वर्षीय आरोपी डॉक्टरचं नाव आहे. तो मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे. पीडित तरुणी २४ वर्षीय असून, ती मोरोक्कोची नागरिक आहे. ही घटना जुने गोव्यातील एका खासगी रुग्णालयात घडली.

उपचार सुरू असताना लैंगिक अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) कामासाठी बिझनेस व्हिसावर गोव्यात आली होती. गोव्यात आल्यानंतर ती एका रिसॉर्टमध्ये वास्तव्याला होती. मात्र इथं तिची तब्येत बिघडली. यानंतर उपाचारासाठी तिला जुन्या गोव्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत होती. यावेळी आरोपी डॉक्टर वृषभ दोशीने 'न्यूरोलॉजिकल सेन्सिटिव्हिटी एक्झामिनेशन' (Neurological Sensitivity Examination) करण्याच्या नावाखाली तिला अश्लील स्पर्श केले. यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला , असा आरोप पीडितेच्या बहिणीने केला आहे. ज्यावेळी अत्याचार झाला, त्यावेळी पीडित तरुणी असहाय्य अवस्थेत होती.
advertisement

आरोपी डॉक्टर सोलापूरमधून अटकेत

या घटनेनंतर आरोपी डॉक्टर वृषभ दोशी गोव्यातून पळून गेला होता. गोवा पोलिसांनी तत्काळ पथके तयार करून त्याचा शोध सुरू केला. अखेर गुरुवारी त्याला सोलापूरमधून अटक करण्यात आली. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी या अटकेची माहिती दिली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement

रुग्णालयाकडून तात्काळ कारवाई

या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाने तत्काळ कारवाई करत आरोपी डॉक्टरला निलंबित केले. रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "रुग्णालयाने पीडितेला पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि पोलीस तक्रार दाखल करण्यास मदत केली आहे. पीडित महिला अजूनही आमच्या रुग्णालयात उपचार घेत असून, या कठीण काळात आम्ही तिला सर्वतोपरी मदत करू." या घटनेमुळे गोव्यात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
सोलापूरच्या डॉक्टरकडून परदेशी तरुणीवर अत्याचार, गोव्यात ICU मध्ये उपचार सुरू असताना अमानुष कृत्य
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement