30 वर्षीय तरुणाचे हातपाय बांधून विहिरीत टाकलं; राहुरीत मित्रांचं धक्कादायक कांड, मृत्यूनं खळबळ
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
त्याला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचे हातपाय बांधून मुळा नदी पात्रात असलेल्या एका विहिरीत त्याला टाकण्यात आलं
अहमदनगर (हरीष दिमोटे, प्रतिनिधी) : राहुरी तालूक्यातील शिलेगाव येथे 30 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय जाधव असं या तरुणाचं नाव आहे. त्याला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचे हातपाय बांधून मुळा नदी पात्रात असलेल्या एका विहिरीत त्याला टाकण्यात आलं. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनं अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिलेगाव येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीत लाकडी दांडे, चप्पल आणि तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील विजय अण्णासाहेब जाधव या 30 वर्षीय तरुणाचा असल्याचं निष्पन्न झालं..
advertisement
विजय हा त्याच्या काही मित्रांसोबत शिलेगाव येथील यात्रेत गेला होता. यात्रेत विजय याचं मित्रांबरोबर भांडण झालं. त्यावेळी त्याच्या मित्रांपैकी चार ते पाच जणांनी विजय जाधव याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांड्याने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विजय जाधव याचा हातपाय बांधलेला मृतदेह विहिरीत आढळून आला.
advertisement
दरम्यान एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, विजय जाधव याचा खून नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला? हे पोलrस तपासातच निष्पन्न होईल. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 16, 2024 12:36 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
30 वर्षीय तरुणाचे हातपाय बांधून विहिरीत टाकलं; राहुरीत मित्रांचं धक्कादायक कांड, मृत्यूनं खळबळ









