कधी घर, तर कधी लॉज, अल्पवयीन मुलीसोबत नराधमाची विकृती, 6 महिने सुरू होता भयंकर प्रकार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Beed Crime News: बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.
Beed Crime News: बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडितेला गोड बोलून एका लॉजवर नेलं, त्याठिकाणी अत्याचार केला आहे. यानंतर आरोपीनं पीडितेचे अश्लील फोटो काढून तिला वारंवार ब्लॅकमेल करत अत्याचार केला आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश सावंत असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्याने धारुर तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीसोबत मैत्री केली होती. नंतरच्या काळात त्याने याच मैत्रीतून मुलीशी जवळीक वाढवली, पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर आरोपीनं पीडितेला स्वत:च्या घरी आणि अंबाजोगाई येथील एका लॉजवर घेऊन जात लैंगिक अत्याचार केला.
नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेसोबत खासगी फोटो काढले. यानंतर संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, वारंवार बलात्कार करण्यात आला. १५ डिसेंबर २०२४ ते २७ जून २०२५ या काळात हा प्रकार घडला. तसेच आरोपीनं लग्न करण्यासाठी पीडितेवर दबाव टाकला. लग्न न केल्यास आत्महत्या करेन, अशी धमकीही दिली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सावंतविरोधात गुन्हा नोंद झाला. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
दुसरीकडे, पुण्यातील कोंढवा परिसरात देखील दोन दिवसांपूर्वी अत्याचाराची एक घटना घडली आहे. येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घुसून नराधमाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं डिलिव्हरी बॉय बनून सोसायटीत प्रवेश केला, यानंतर त्याने पीडितेच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
July 04, 2025 7:04 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
कधी घर, तर कधी लॉज, अल्पवयीन मुलीसोबत नराधमाची विकृती, 6 महिने सुरू होता भयंकर प्रकार


