पैशांचं आमिष, 5 महिलांना स्पामध्ये आणून सुरू केला भलताच धंदा, छापेमारीत कांड उघडकीस
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Gondia: गोंदिया शहराच्या मुख्य भागात सुरू असलेल्या अवैध धंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येथील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार...
रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया: गोंदिया शहराच्या मुख्य भागात सुरू असलेल्या अवैध धंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येथील जयस्तंभ चौकातील बस स्टापच्या समोर एक मॉस मेकअप स्टुडिओ अँड स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली. यावेळी स्पा सेंटरमध्ये काही महिला ग्राहकांसोबत नको त्या अवस्थेत आढळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी धाड टाकली असता एका रुममध्ये बेडवर ग्राहकासोबत एक महिला आढळून आली. तिची चौकशी केली असता मॉस मेकअप स्टुडिओ अँड बॉडी स्पा सेंटरचे मालक बळीराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप घोटेकर हे स्पा सेंटरमध्ये देहव्यवसाय करायला लावतो, असे महिलेने सांगितलं. या स्पा सेंटरची पाहणी केली असता पहिल्या मजल्यावर ५ महिला आढळून आल्या.
advertisement
त्यांनी देखील स्पा मालक बलीराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप घोटेकर हे देहव्यवसाय करायला लावतात असं पोलिसांना सांगितले. दोन्ही आरोपी गोंदिया येथील रहिवासी आहेत. ते महिलांना पैशांचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यानंतर स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना वेश्याव्यवसाय करायला भाग पाडत होते. हा प्रकार समोर आल्यानंतर गोंदिया शहर पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये अंतर्गत दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
याबाबत माहिती देताना गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांनी सांगितलं की, गोंदिया शहरात जे बॉडी स्पा सेंटर सुरू आहेत, अशा सर्व बॉडी स्पाला नोटीस देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे काही कृत्य त्यांच्याकडे आढळून आल्यास त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येणार, अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली.
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
July 12, 2025 8:47 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पैशांचं आमिष, 5 महिलांना स्पामध्ये आणून सुरू केला भलताच धंदा, छापेमारीत कांड उघडकीस