निक्की हुंडाबळी प्रकरण, आरोपी पतीचा पोलिसांकडून एन्काऊंटर, पोलीस कोठडीतून पळण्याचा केला प्रयत्न
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी पत्नी निक्कीला जाळून मारणाऱ्या पती विपिनची पोलिसांशी चकमक झाली. चकमकीत आरोपी विपिनच्या पायाला गोळी लागली.
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी पत्नी निक्कीला जाळून मारणाऱ्या पती विपिनची पोलिसांशी चकमक झाली. चकमकीत आरोपी विपिनच्या पायाला गोळी लागली. तो पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ही चकमक घडल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला पण विपिन थांबला नाही. त्यानंतर पोलिसांनी गोळी झाडली जी विपिनच्या पायाला लागली. सध्या त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी दुपारी पोलीस पथक आरोपीला चौकशी साठी घेऊन जात होते. त्याने जिथून थिनरची बाटली खरेदी केली होती, तिथे त्याला घेऊन जात होते. त्यावेळी विपिनने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून घेतला आणि पळू लागला. त्यानंतर पोलिसांनी गोळी झाडली आणि गोळी त्याच्या पायाला लागली.
चकमकीनंतर, निकीच्या वडिलांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला सांगितलं की, पोलिसांनी योग्य काम केले आहे, गुन्हेगार नेहमीच पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. विपिन देखील गुन्हेगार आहे. आम्ही पोलिसांना इतरांनाही पकडण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती करतो.
advertisement
हुंड्याच्या मागणीवरून पत्नी निक्कीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या विपिनकडूनही एक निवेदन आले आहे. विपिन म्हणाला की मला कोणताही पश्चात्ताप नाही. मी तिला मारले नाही. ती स्वतः जीवन संपवलं आहे. पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणे होतात, ही एक सामान्य गोष्ट आहे. विपिनवर आरोप आहे की त्याने प्रथम निक्कीला केस धरून ओढले आणि नंतर तिच्या बहिणी आणि मुलासमोर तिला आग लावली. पीडितेच्या सहा वर्षांच्या मुलाने गुरुवारी रात्री घडलेली ही घटना पाहिली. मुलगा म्हणाला, "मी माझ्या आईवर काहीतरी ओतले, नंतर तिला मारले आणि लाईटरने तिला पेटवून दिले."
Location :
Noida,Gautam Buddha Nagar,Uttar Pradesh
First Published :
August 24, 2025 2:36 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
निक्की हुंडाबळी प्रकरण, आरोपी पतीचा पोलिसांकडून एन्काऊंटर, पोलीस कोठडीतून पळण्याचा केला प्रयत्न