Indore couple case : सोनम बेवफा नहीं है! भाऊ गेला पण दीराने दिली वहिनीला साथ, म्हणाले 'बिट्टीने Video Call केला अन्...'

Last Updated:

Raja brother Vipin Raghuvanshi claims : सोनमला अटक झाली नाही किंवा तिने सरेंडर देखील केलं नाही, असं विपिन रघुवंशी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.

Raja brother Vipin Raghuvanshi claims
Raja brother Vipin Raghuvanshi claims
Indore Couple Murder case : मेघालयात बेपत्ता झालेले इंदूरचा राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता असलेली सोनम उत्तर प्रदेशात सापडली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, सोनमने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याच्या आणि तिला अटक झाल्याची माहिती राजाचा भाऊ विपिन रघुवंशी (Raja brother Vipin Raghuvanshi) यांनी फेटाळून लावली आहेत. सोनमला अटक झाली नाही किंवा तिने सरेंडर देखील केलं नाही, असं विपिन रघुवंशी यांनी म्हटलं आहे.

तुझा चेहरा दाखव, तू कोण आहेस?

विपिन रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काल ( 8 जून 2025) रात्री राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांनी गोविंदला (सोनमचा भाऊ) फोन केला. सोनमने फोनवर 'मी बिट्टी बोलतेय, भाऊ' असे सांगितले. त्यावर आम्ही तिला आधी 'तुझा चेहरा दाखव, तू कोण आहेस?' असे विचारले. त्यानंतर सोनमने तिथून व्हिडिओ कॉल केला आणि तेव्हाच आम्हाला ती सोनम असल्याची खात्री पटली."
advertisement

पोलिसांना फोन केला अन्...

पुढील माहिती देताना विपिन रघुवंशी म्हणाले, "आम्ही लगेच उत्तर प्रदेश पोलिसांना फोन केला आणि ते तिथे पोहोचले व सोनमला त्यांच्यासोबत घेऊन गेले. ती फक्त तिथे बसली होती. पोलिसांनी तिला अटक केलेली नाही, आणि तिने आत्मसमर्पणही केलेले नाही. या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत."
advertisement
advertisement
मेघालयचे डीजीपी सोनमला मारेकरी म्हणत असले तरी, 'सोनमची अद्याप व्यवस्थित चौकशीही झालेली नाही. तिला अधिकृतपणे काहीही सांगितले गेलेले नाही,' असा दावाही विपिन रघुवंशी यांनी केला आहे. यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सोनमच्या जबाबातून या प्रकरणातील अनेक रहस्ये उलगडण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान, जेव्हा त्यांचं लग्न ठरलं तेव्हा सर्वजण खूप आनंदी होते. सोनम असे काही करू शकते असा आम्हाला कधीच संशय नव्हता. दोघांचा मेघालयला जाण्याचा कोणाचा बेत होता हे आम्हाला माहित नाही. त्यांनी परतीचं तिकीटही बुक केलं नव्हतं, असंही राजाच्या भावाने म्हटलं आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Indore couple case : सोनम बेवफा नहीं है! भाऊ गेला पण दीराने दिली वहिनीला साथ, म्हणाले 'बिट्टीने Video Call केला अन्...'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement