advertisement

आईवरून दिलेल्या शिव्या जिव्हारी लागल्या, मित्रानं थेट काटाच काढला; जालन्यातील तरुणाचा गेम कसा फसला?

Last Updated:

मृतदेहाच्या डोक्यावर आणि अंगावर रक्त पडलेलं होतं,अखेर काही तासातच खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Jalna Crime News
Jalna Crime News
जालना : दारू पाजली नाही म्हणून मित्राला आईवरून शिवीगाळ करणं जालन्यातील एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय.ज्याला आईवरून शिवीगाळ केली त्यांनं शिवीगाळ करणाऱ्या मित्राच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली आहे. जालन्यातील जामवाडी शिवारात एका तरुणाची हत्या झाली होती. बंटी रंजवे असं हत्या झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे, त्यानुसार पोलीस तपास करत होते.
जालन्यातील जामवाडीतील एका पेट्रोल पंपाजवळ मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. शनिवारी सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे.या घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तरुणाचा मृतदेह देऊळगाव राजा रोडवरील जामवाडी शिवारातील एका पेट्रोल पंपाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला. मृतदेहाच्या डोक्यावर आणि अंगावर रक्त पडलेलं होतं,अखेर काही तासातच खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
advertisement

संतापलेल्या संदिपनं बंटीच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घातले घाव 

समोर आलेल्या माहितीनुसार, शहरातील कन्हैयानगर भागातील संदीप राऊत याने खून केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत बंटी आणि सदीप राऊतकडे आरोपी हे दोघंही जालन्यातील कन्हैयानगर भागातील रहिवासी आहे. बंटी रंजवे यानं त्याचा मित्र असलेल्या संदीप राऊतकडे दारू पाजण्याचा हट्ट धरला.मात्र त्यानं दारू न पाजल्यानं बंटीनं त्याला आईवरून शिवीगाळ केली.या शिवीगाळीमुळे संतापलेल्या संदिपनं बंटीच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले.यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी आरोपी संदीप राऊतवर तालुका जालना पोलिसांत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
आईवरून दिलेल्या शिव्या जिव्हारी लागल्या, मित्रानं थेट काटाच काढला; जालन्यातील तरुणाचा गेम कसा फसला?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement