तुमकुरु मर्डर मिस्ट्रीचा अखेर खुलासा! डॉक्टर जावयानेच काढला सासूचा काटा, शहरात 19 ठिकाणी सापडले शरिराचे तुकडे अन्...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Karnataka Tumakuru Murder Mistry : एका भटक्या कुत्र्याने मानवी हात तोंडात घेऊन तो फिरत असल्याचे दिसून आले. या क्लूमुळेच पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. जसाजसा तपास पुढे सरकला तसंतसं मोठमोठे खुलासे होऊ लागले.
Tumakuru Murder Mistry : काही घटना अशा असतात, त्यामुळे अंगावर शहारे येतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातील एका महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 20 तुकडे करण्यात आले आणि हे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले होते. या प्रकरणाची सुरुवात 7 ऑगस्ट रोजी तुमकुरु जिल्ह्यातील कोराटागेरेच्या चिम्पुगनहल्लीमध्ये झाली, जिथे एका भटक्या कुत्र्याने मानवी हात तोंडात घेऊन तो फिरत असल्याचे दिसून आले. या क्लूमुळेच पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. जसाजसा तपास पुढे सरकला तसंतसं मोठमोठे खुलासे होऊ लागले.
पोलिसांना पाच किलोमीटरच्या परिसरातून मृतदेहाचे 19 तुकडे मिळाले, पण या तुकड्यांमध्ये शिर नव्हते. नंतर, हे तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले, तेव्हा असे समोर आले की हे अवशेष एका महिलेचे आहेत. ही महिला कोण होती, हे ओळखणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान होते. तपासादरम्यान, पोलिसांना मृतदेहाच्या तुकड्यांवर काही दागिने आढळले. यावरून, हा खून लूटमारीच्या उद्देशाने झाला नव्हता, हे स्पष्ट झाले.
advertisement
त्यानंतर, पोलिसांनी तुमकुरु जिल्ह्यातील बेपत्ता महिलांची यादी तपासली. त्यावेळी त्यांना समजले की 42 वर्षांची बी. लक्ष्मीदेवी उर्फ लक्ष्मीदेवम्मा 3 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. तिच्या पतीने ती मुलगी तेजस्विनीकडे हनुमंतपुरा येथे गेली असल्याचे सांगितले. दोन दिवसांनी, कोराटागेरेमधील एका निर्जन ठिकाणी या महिलेचे शिर सापडले. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना, त्यांना 3 ऑगस्ट रोजी हनुमंतपुरा येथून कोराटागेरेच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाची एसयूव्ही गेल्याची माहिती मिळाली. तपासणीत असे समोर आले की या गाडीला वेगवेगळ्या नंबर प्लेट्स होत्या. पोलिसांनी या गाडीचा तपास केला आणि त्यांना समजले की ती गाडी उर्डिगेरे गावातील सतीश नावाच्या शेतकऱ्याची आहे. पोलिसांनी सतीशचे फोन रेकॉर्ड्स तपासले, तेव्हा त्यांना कळले की 3 ऑगस्ट रोजी त्याचा फोन बंद होता. त्याच दिवशी लक्ष्मीदेवम्मा देखील बेपत्ता झाली होती. पोलिसांनी सतीश आणि त्याचा सहकारी किरण यांना चिक्कमगलुरुमधील एका मंदिराजवळून ताब्यात घेतले.
advertisement
या प्रकरणात डॉ. रामचन्द्रैया हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. डॉ. रामचन्द्रैया हे लक्ष्मीदेवी यांची मुलगी तेजस्विनी हिचे दुसरे पती आहेत. डॉ. रामचन्द्रैया याने लक्ष्मीदेवीवर त्यांच्या लग्नात हस्तक्षेप करत असल्याचा आणि आपल्या मुलीवर वाईट काम करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला. या रागामुळे त्याने सहा महिन्यांपूर्वीच लक्ष्मीदेवीला मारण्याचा कट रचला होता. त्यानुसार त्याने सतीशच्या नावावर एक पांढऱ्या रंगाची एसयूव्ही विकत घेतली, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो फक्त सात दिवसांतच पकडला गेला.
advertisement
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रामचंद्रय्या हा 47 वर्षांचा दंतचिकित्सक होता. तो त्याची सासू लक्ष्मीदेवम्मा हिच्यामुळे त्रस्त झाला होता. लक्ष्मीदेवम्मा त्याच्या लग्नात हस्तक्षेप करत असल्याचा त्याला संशय होता. तसेच, ती आपली मुलगी तेजस्विनीवर (डॉक्टरची दुसरी पत्नी) चुकीच्या गोष्टी करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोपही त्याने केला होता. तेजस्विनी ही डॉ. रामचंद्रय्या यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होती आणि त्यांना 3 वर्षांचे बाळदेखील आहे.
advertisement
Location :
Karnataka
First Published :
August 13, 2025 10:29 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
तुमकुरु मर्डर मिस्ट्रीचा अखेर खुलासा! डॉक्टर जावयानेच काढला सासूचा काटा, शहरात 19 ठिकाणी सापडले शरिराचे तुकडे अन्...