Mangesh Kalokhe Death Case : खोपोली हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट, बीडच्या वाल्मीक कराड गँगचं कनेक्शन समोर!

Last Updated:

Mangesh Kalokhe Murder Walmik karad Connection : आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणाचे 'बीड कनेक्शन' उघड केले असून, मुख्य आरोपी रवी देवकर याचा बॉडीगार्ड बीडचा असल्याचं समोर आलं आहे.

Mangesh Kalokhe Murder Walmik karad Connection
Mangesh Kalokhe Murder Walmik karad Connection
Mangesh Kalokhe Death Case : खोपोली येथील शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येचा तपास सुरू असताना आता त्याचे धागेदोरे बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रात या प्रकरणाने खळबळ उडाली असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणात मोठा खुलासा केलाय.

19 वार केल्याचा दावा

आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणाचे 'बीड कनेक्शन' उघड केले असून, मुख्य आरोपी रवी देवकर याचा बॉडीगार्ड बीडचा असल्याचं समोर आलं आहे. या बॉडीगार्डनेच मंगेश काळोखे यांच्यावर 19 वार केल्याचा दावा करण्यात येत असून, त्याचे काही बड्या राजकीय नेत्यांच्या गटाशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप थोरवे यांनी केला आहे.
advertisement

आतापर्यंत 8 जणांवर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो या संशयाला अधिक बळ देत असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं. या हत्याकांडामागे राजकीय वैमनस्याची मोठी पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा राग मनात धरून हा कट रचण्यात आल्याची चर्चा होती. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये काही मोठ्या राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने हे प्रकरण चांगलेच तापलंय.
advertisement

पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा

दरम्यान, आरोपींच्या अटकेसाठी आता दबाब वाढू लागला असून, सोमवारी संध्याकाळी खोपोली पोलीस ठाण्यावर कँडल मार्च काढण्यात येणार आहे. जोपर्यंत सर्व दोषींना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार थोरवे यांनी दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात या प्रकरणाचा तपास कोणता मार्ग घेतो आणि पोलीस काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Mangesh Kalokhe Death Case : खोपोली हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट, बीडच्या वाल्मीक कराड गँगचं कनेक्शन समोर!
Next Article
advertisement
Dharashiv News: तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या!
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु
  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

View All
advertisement