Latur News: अडीच वर्ष गुंगारा दिला, पोलीस पकडायला आले तेव्हा गटारात लपला; लातूरच्या चोराची वॉशिंग सेंटरवर 'धुलाई'
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अशोक असे या जनावर चोराचे नाव आहे. जनावरांची चोरी करणारा अट्टल चोर मागील अनेक वर्षापासून केवळ महाराष्ट्र नाही तर कर्नाटकात देखील सक्रिय आहे.
लातूर : गेली अडीच वर्ष उदगीर पोलिसांना गुंगारा देणारा चोर अखेर गटारात सापडला. पोलीस पकडायला आले तेव्हा तो गटारात लपला होता मग पोलिसांना गटारातल्या बुडालेल्या चोराला कार वॉशिंग सेंटरवर नेत त्याची चांगलीच धुलाई केलीय. जनावर चोरण्यात पटाईत असलेला चोर अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होत. त्याने उदगीरमधून म्हशी चोरल्या होत्या, त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते.
अशोक असे या जनावर चोराचे नाव आहे. जनावरांची चोरी करणारा अट्टल चोर मागील अनेक वर्षापासून केवळ महाराष्ट्र नाही तर कर्नाटकात देखील सक्रिय आहे. पोलिसांना तो लातूरमध्ये आल्याची माहिती खबरींकडून मिळाली.त्यानंतर पोलीस त्याला पकडण्यासाठी येत असल्याचे कळताच हा सराईत थेट गटरातच जाऊन लपला, फक्त चेहरा बाहेर ठेवला होता. मात्र पोलिसांनी गटरात घाणीने माखलेल्या अशोकला अलगद बाहेर काढलं. एवढ झाल्यानंतर देखील सुटून जाण्यासाठी तो धडपड करत होता. पोलिसांच्या अंगावर घाण टाकण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून त्याला पळ काढता येईल.
advertisement
अशोकची धुलाई अन् बघ्यांची गर्दी
पोलिसांनी देखील अशोकला गटारातून उचलला आणि थेट एका वॉशिंग सेंटरवर आणला आणि त्याची चांगलीच धुलाई केली. ही बातमी परिसरात इतक्या वेगाने पसरली की वॉशिंग सेंटरवर बघ्यांची गर्दी झाली. हा सगळा प्रकार रेल्वे स्टेशन भागात घडला. अशोकची पाण्याने धुलाई केल्यानंतर पोलिसांनी मग त्याची वरात पोलिस स्थानकाकडे नेली, मात्र अशोकची धुलाई हा दिवसभर चर्चेचा विषय ठरला.
advertisement
उदगीर पोलीस तपास करत आहे
महाराष्ट्र आणि कर्नाटकात जनावरांची चोरी करायचा. उदगीर आणि कर्नाटकातील काही भागात म्हशी चोरण्यात तो पटाईत होता. पोलिसांनी अशोकला अटक केली असून त्याने कुठे कुठे जनावरे चोरली, ती कुठे विकली याचा तपास उदगीर पोलीस करत आहेत.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Apr 06, 2025 8:45 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Latur News: अडीच वर्ष गुंगारा दिला, पोलीस पकडायला आले तेव्हा गटारात लपला; लातूरच्या चोराची वॉशिंग सेंटरवर 'धुलाई'








