त्याच्या तीन बायका, तिचे दोन नवरे, दोघांचं सूत जुळलं अन्.., लिव्ह इन पार्टनरला पाठलाग करून संपवलं

Last Updated:

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

News18
News18
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीच्या कारचा पाठलाग केला. यानंतर भररस्त्यात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं आहे. या दुर्दैवी घटनेत तरुणीचा होरपळून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लिव्ह इन पार्टनरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
वनजाक्षी असं हत्या झालेल्या ३५ वर्षीय महिलेचं नाव आहे. तर विठ्ठल असं आरोपीचं नाव आहे. आरोपी विठ्ठल हा कॅब ड्रायव्हर आहे. तो मागील चार वर्षांपासून वनजाक्षीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. आरोपी विठ्ठल याने यापूर्वी तीन विवाह केले होते. तर वनजाक्षी हिनेही दोनदा लग्न केलं होतं. यानंतर दोघंही लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण विठ्ठल याला दारुचं व्यसन होतं. तो दारुच्या नशेत अनेकदा वनजाक्षीला मारहाण करत असायचा. यामुळे मागील काही दिवसां पासून दोघांमध्ये वाद सुरू होता.
advertisement
दारु पिऊन विठ्ठल वारंवार छळ करतो. मारझोड करतो, यामुळे वनजाक्षी विठ्ठलपासून दूर गेली होती. ती कर्नाटक रक्षण वेदिकेचा सदस्य असलेल्या मरियाप्पा या दुसऱ्या पुरूषाच्या संपर्कात आली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. घटनेच्या दिवशी वनजाक्षी आपला प्रियकर मरियाप्पा आणि चालकासह मंदिरातून परत येत होती. यावेळी आरोपी विठ्ठल त्यांच्या कारचा पाठलाग करत होता.
advertisement
ज्यावेळी वनजाक्षीची कार ट्रॅफिक सिग्नलवर थांबली. तेव्हा आरोपीने त्यांची अडवली आणि खिडकीतून आतमध्ये पेट्रोल ओतले. वनजाक्षी, मरियाप्पा आणि ड्रायव्हर तिघांवरही त्याने पेट्रोल ओतले. पण मरियाप्पा आणि चालक पळून जाण्यात यशस्वी झाले, तर विठ्ठलने वनजाक्षीचा पाठलाग केला, तिच्यावर अधिक पेट्रोल ओतले आणि लाईटरने तिला पेटवून दिले. ही घटना बंगळुरूमध्ये घडली.
तेथून जाणाऱ्या एका हा प्रकार पाहिल्यानंतर तो पीडितेच्या बचावासाठी धावला. त्याने आग विझवण्यासाठी कापडाचा तुकडा वापरला आणि इतरांच्या मदतीने तिला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या प्रक्रियेत, तो देखील किरकोळ भाजला. वनजाक्षी ६० टक्के भाजली होती, उपचारादरम्यान तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. हा कांड उघडकीस येताच पोलिसांनी विठ्ठल याला अवघ्या २४ तासांत अटक केली. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
त्याच्या तीन बायका, तिचे दोन नवरे, दोघांचं सूत जुळलं अन्.., लिव्ह इन पार्टनरला पाठलाग करून संपवलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement