इन्स्टाग्रामवर फुललं प्रेम, लॉजवर ओलांडल्या मर्यादा, BFची चाल समजताच तरुणीनं गाठलं पोलीस स्टेशन
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे.
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. यातूनच त्यांनी लॉजवर जाऊन सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. पण ब्रेकअपनंतर आरोपीची चाल तरुणीच्या लक्षात आली. यानंतर तिने थेट शेगाव पोलीस ठाण्यात जात बॉयफ्रेंडविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवून घेतला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास यामे असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्याची इन्स्टाग्रामवर पीडित तरुणीशी ओळख झाली होती. अनेक दिवस इन्स्टाग्रामवर चॅटींग केल्यानंतर दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडले आणि भेटीगाठी सुरू झाल्या.
advertisement
१७ जून २०२४ रोजी आरोपी आणि पीडितेला घेऊन शेगावला आला होता. याठिकाणी दोघंही एका लॉजवर थांबले होते. याठिकाणी आरोपी तरुणाने पीडितेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये पुन्हा दोघं शेगावला भेटले. यावेळीही आरोपीनं पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. वारंवार शरीरसंबंध ठेवल्यानंतर मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
advertisement
डिसेंबर महिन्यापासून आरोपीनं पीडितेसोबतचा संपर्क तोडलं. तिच्याशी बोलणं बंद केलं. तिने वारंवार संपर्क केला, तरी तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. आरोपी केवळ लग्नाचं आमिष दाखवून आपल्याशी शरीरसंबंध ठेवतोय, ही बॉयफ्रेंडची चाल लक्षात आल्यानंतर पीडितेनं थेट शेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार आरोपी तरुणीने केली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
Mar 25, 2025 12:12 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
इन्स्टाग्रामवर फुललं प्रेम, लॉजवर ओलांडल्या मर्यादा, BFची चाल समजताच तरुणीनं गाठलं पोलीस स्टेशन









