Mahakumbh : कुंभ स्नानाला गेली महिला, डुबकी मारण्याआधीच 'पाप' चोरीला गेलं, नदीतले भाविक पाहतच राहिले
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी महाकुंभमध्ये स्नान केलं आहे. महाकुंभमध्ये डुबकी लावत असताना गंगा नदीमध्ये पूजेचं साहित्यही अर्पण केलं जातं.
प्रयागराज : प्रयागराजमधील महाकुंभ आता अवघ्या काही दिवसांमध्ये संपणार आहे. फक्त भारतच नाही तर परदेशातल्याही अनेक नागरिकांनीही महाकुंभमध्ये डुबकी लावून आपली पाप धुतली. आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी महाकुंभमध्ये स्नान केलं आहे. महाकुंभमध्ये डुबकी लावत असताना गंगा नदीमध्ये पूजेचं साहित्यही अर्पण केलं जातं.
संगमाच्या पाण्यात नारळ, फुले, अगरबत्ती आणि इतर वस्तू तरंगत असतात. भाविक मोठ्या श्रद्धेने या वस्तू गंगेमध्ये अर्पण करत होते. पण या काळात गिधाडांसारखे काही लोक त्या वस्तूंवर डोळे ठेवून होते. भाविकांनी वस्तू पाण्यात सोडताच, तिकडे मुले, महिलांसह लोक टोळ्यांमध्ये जमायचे आणि गंगेत सोडलेल्या वस्तू लुटायला सुरुवात करायचे. अनेकांनी अशा दरोड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.
advertisement
हातातून वस्तू हिसकावल्या
महाकुंभात असे बरेच लोक आहेत जे पाण्यात वाहून जाणारे साहित्य गोळा करून विकतात. पाण्यात तरंगणारे नारळ आणि इतर साहित्य हे लोक गोळा करतात आणि नंतर ते दुकानात देऊन पुन्हा विकतात. बऱ्याच ठिकाणी, दुकानदार स्वतः मुलांना आणि महिलांना नारळ आणि इतर पूजा साहित्य पुन्हा विकण्यासाठी कामावर ठेवतात.
advertisement
सुरुवातीला हे लोक भक्तांनी अर्पण केलेलं साहित्य गोळा करायचे, पण आता महाकुंभचे शेवटचे दिवस असल्यामुळे ही टोळी भाविकांच्या हातातून वस्तू हिसकावून घेत आहेत.
महिला धक्क्यात
अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. यामध्ये एक महिला तिच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी संगमावर नारळ आणि इतर पूजा साहित्य अर्पण करताना दिसली. पण साहित्य पाण्यात टाकताच महिलेभोवती उभ्या असलेल्या अनेक मुलांनी त्यावर झडप घातली. महिलेच्या हातातून सर्व साहित्य हिसकावून घेण्यात आले. हे पाहून त्या महिलेलाही धक्का बसला. संगमात स्नान करताना अनेक लोकांसोबत अशा घटना घडत असल्याचे सांगितले जात आहे.
Location :
Allahabad,Allahabad,Uttar Pradesh
First Published :
February 21, 2025 10:30 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Mahakumbh : कुंभ स्नानाला गेली महिला, डुबकी मारण्याआधीच 'पाप' चोरीला गेलं, नदीतले भाविक पाहतच राहिले