'तुझ्या मुलाला टॉपर बनवतो', बुलढाण्यात 2 शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार

Last Updated:

Crime in Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये शाळेच्या दोन शिक्षकांनी एका विद्यार्थ्याच्या आईवर लैंगिक अत्याचार केला आहे.

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील शाळेच्या दोन शिक्षकांनी एका विद्यार्थ्याच्या आईवर लैंगिक अत्याचार केला आहे. तुझ्या मुलाला टॉपर बनवतो, असं आमिष दाखवून आरोपींनी विद्यार्थ्याच्या आईला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. नराधम शिक्षक मागील अनेक दिवसांपासून वेळोवेळी पीडित महिलेचं लैंगिक शोषण करत होते. आरोपी शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही शिक्षकांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. समाधान इंगळे आणि अनिल थाटे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी शिक्षकांची नावं आहेत. यातील आरोपी समाधान इंगळे वर्गशिक्षक तर अनिल थाटे हा त्याच शाळेतला शिक्षक आहे. या दोघांनी विद्यार्थ्याच्या आईवरच वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी वर्गशिक्षकासह सहकारी शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. हे दोन्ही शिक्षक मलकापूर येथील नूतन महाविद्यालयात कार्यरत आहेत.
advertisement
तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊ. पहिला नंबर आणू, यासाठी आम्हाला खूश कर, असं म्हणत संबंधित शिक्षकांनी पीडितेकडं शरीरसुखाची मागणी केली. यानंतर आरोपी वर्गशिक्षकाने आणि त्याच्या सहकारी शिक्षकाने विद्यार्थ्याच्या आईवरच वेळोवेळी बलात्कार केला. बलात्काराची ही घटना उघडकीस आल्यानंतर मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडालीय. पोलिसांनी दोन्ही नराधम शिक्षकांना अटक केली आहे.
आरोपी शिक्षकांनी ३४ वर्षीय पीडित महिलेला धमकी देखील दिली होती. आम्हा दोघांना खूश ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या मुलाला जिवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'तुझ्या मुलाला टॉपर बनवतो', बुलढाण्यात 2 शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement