advertisement

दुप्पट वयाच्या पोरावर प्रेम, भेटायला कॅफेत गेली अन् नको तेच घडलं, जिल्ह्याला हादरवणारी घटना!

Last Updated:

Crime News: एका अल्पवयीन मुलीवर तिच्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या तरुणाने कॅफेत अत्याचार केला आहे. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर ओळख झालेल्या मुलावर प्रेम करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. वयाने दुप्पट असलेल्या एका तरुणाने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं कॅफेत भेटायला बोलवून त्याच ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
समीर राजू देशमुख असं २७ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील रहिवासी आहे. त्याने मलकापूर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचाराच्या या घटनेनंतर पीडित मुलगी काही दिवस शांत राहिली. मात्र आता तिने आपल्या कुटुंबासह मलकापूर पोलीस ठाण्यात जाऊन सगळी आपबिती सांगितली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समीर आणि अल्पवयीन पीडित मुलगी यांची वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. काही दिवस ऑनलाईन गप्पा मारल्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. पीडित मुलीचं देखील वयाने दुप्पट असलेल्या तरुणावर प्रेम जडलं. पण हे प्रेम पीडित मुलीला चांगलंच महागात पडलं. वर्षभर संपर्कात राहिल्यानंतर आरोपीनं गेल्यावर्षी १२ डिसेंबरला पीडितेला भेटायला बोलावलं होतं. मलकापूरमधील 'हँग आऊट' कॅफेत दोघांनी भेटायचं ठरवलं.
advertisement
पीडित मुलगी याठिकाणी आरोपीला भेटायला आली असता आरोपीनं पीडितेच्या अज्ञातपणाचा फायदा घेत तिच्या इच्छेविरुद्ध कॅफेतच लैंगिक अत्याचार केला. या घटनेबद्दल घरच्यांना सांगितलं तर घरचे मारतील, या भीतीने घडलेला प्रकार मुलीने कुणालाच सांगितला नाही. मात्र घटनेच्या दोन महिन्यानंतर पीडितेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर पीडितेनं पालकांसह मलकापूर पोलीस ठाण्यात जात आरोपी समीर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
दुप्पट वयाच्या पोरावर प्रेम, भेटायला कॅफेत गेली अन् नको तेच घडलं, जिल्ह्याला हादरवणारी घटना!
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement