नागपूर: 3 मुलींना विवस्त्र पूजेला बसवा, पैशांचा पाऊस पाडतो म्हणत भोंदूबाबाने केला भयंकर कांड!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Nagpur: नागपूरच्या मनकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भोंदू बाबाने घरात पैशांचा पाऊस पाडतो, अशी बतावणी करून तीन अल्पवयीन मुलींसोबत भयंकर कांड केला आहे.
नागपूर: नागपूरच्या मनकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका भोंदू बाबाने घरात पैशांचा पाऊस पाडतो, अशी बतावणी करून तीन अल्पवयीन मुलींसोबत भयंकर कांड केला आहे. या प्रकरणी मनकापूर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जातोय.
अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबा असं नराधम आरोपीचं नाव आहे. पैशांचा पाऊस पाडतो, त्यासाठी तीन अल्पवयीन मुली लागतील, त्यांना नग्नावस्थेत पूजेला बसवा, अशी बतावणी करून भोंदू बाबाने तिन्ही अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केलं आहे. अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबाने यापूर्वी नागपुरात काही जणांना आपल्या जाळ्यात फसवल्याचं स्पष्ट झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडणे शक्य आहे, त्यासाठी विशेष पूजा करावी लागेल. आणि त्यासाठी तीन अल्पवयीन मुली लागतील. तिन्ही मुलींना पूजेच्या वेळी नग्नावस्थेत बसावे लागेल, अशी बतावणी आरोपीनं केली होती. आरोपीच्या बतावणीला बळी पडून आशू कोचे आणि गायत्री उकरे नावाच्या पुरुष आणि महिलेने तीन अल्पवयीन मुलींची व्यवस्था केली.
advertisement
काही दिवसांपूर्वी गायत्री उकरेच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच ठिकाणी भोंदू बाबाने तीनही अल्पवयीन मुलींचे एकापाठोपाठ एक असे शारीरिक शोषण केले. नग्नावस्थेत पूजेला बसवल्यानंतर नराधम आरोपीने मुलींना गुंगीचं औषध दिलं होतं. मुली बेशुद्ध पडल्यानंतर त्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. भोंदू बाबाच्या या कृत्यानंतर पैशांचा पाऊस तर पडलाच नाही, मात्र तिन्ही मुलींना त्यांचे लैंगिक छळ झाल्याचे समजले.
advertisement
एका ओळखीच्या व्यक्तीच्या मार्फत तिघींनी नागपूरच्या मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबा अब्दुल कुरेशी याच्यासह गायत्री उकरे आणि आशू कोचे या तिघांना अटक केली आहे. पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये इतर काही मुलींचे फोटो आढळल्यामुळे या भोंदू बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आणखी काही मुलींचे लैंगिक शोषण केले आहे का याचा शोध पोलीस घेत आहे.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
Apr 25, 2025 7:04 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
नागपूर: 3 मुलींना विवस्त्र पूजेला बसवा, पैशांचा पाऊस पाडतो म्हणत भोंदूबाबाने केला भयंकर कांड!








