पत्नीला जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या, बेडरूममध्ये छुपे कॅमेरे..., नाशिकला पती अन् दिराचं भयानक कांड

Last Updated:

Nashik News: पतीने बेडरूममध्ये तिची नजर चुकवून छुपे कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तिचे खाजगी फोटो काढण्यात आले.

जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या, बेडरूममध्ये छुपे कॅमरे, पतीनंच पत्नीसोबत..., नाशिकमध्ये भयंकर कांड (Ai Photo)
जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या, बेडरूममध्ये छुपे कॅमरे, पतीनंच पत्नीसोबत..., नाशिकमध्ये भयंकर कांड (Ai Photo)
नाशिक : शहरातील काठेगल्ली परिसरात एका नवविवाहितेचा सासरी अमानुष छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या पतीनेच बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून तिचे खासगी चित्रीकरण केले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दिराने विनयभंग केल्याची खळबळजनक तक्रार भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि दिराविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह झाल्यानंतर काही दिवसांपासूनच सासरच्या मंडळींनी क्षुल्लक कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करण्यात आली. तसेच तिच्यावर चोरीचा खोटा आळही घेण्यात आला.
advertisement
छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण
पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे की, तिच्या पतीने बेडरूममध्ये तिची नजर चुकवून छुपे कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तिचे खासगी फोटो काढण्यात आले. हे फोटो मॉर्फ (छेडछाड) करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पतीने आणि दिराने दिली. याच फोटोंचा धाक दाखवून दिराने पीडितेवर घटस्फोटासाठी दबाव टाकला आणि तिचा विनयभंग केला.
advertisement
जेवणातून दिल्या झोपेच्या गोळ्या
सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाची व्याप्ती इतकी मोठी होती की, पीडितेच्या सासूने तिला जेवणातून गुंगीकारक औषधे किंवा झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बेशुद्धावस्थेत असताना पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला.
गुन्हा दाखल
या छळाला कंटाळून पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली. भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पतीविरुद्ध लैंगिक छळ, दिराविरुद्ध विनयभंग आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराच्या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून छुप्या कॅमेऱ्यांच्या तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पत्नीला जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या, बेडरूममध्ये छुपे कॅमेरे..., नाशिकला पती अन् दिराचं भयानक कांड
Next Article
advertisement
Raj Thackeray : बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
  • महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू आहे.

  • मनसे मुंबईत उद्धव यांची साथ सोडून थेट महायुतीला पाठिंबा देतील अशी चर्चा

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

View All
advertisement