6 महिने डांबून ठेवलं, नराधमांनी 23 वर्षीय तरुणीच्या शरीराचे तोडले लचके, देशाला हादरवणारा सामूहिक अत्याचार

Last Updated:

माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्यावर तब्बल सहा महिने लैंगिक अत्याचार केला आहे.

News18
News18
माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्यावर तब्बल सहा महिने लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी तिच्यावर अनेकदा सामूहिक अत्याचारही केला आहे. पीडित तरुणीला दमदाटी करून मागील सहा महिन्यांपासून तिचं लैंगिक शोषण केलं जात होतं. अखेर पीडितेनं अलीकडेच नराधमांच्या तावडीतून सुटका करून घेतली, यानंतर हा माणुसकीला कलंक फासणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील आहे. इथं एका २३ वर्षीय तरुणीचे अपहरण करून गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर अनेक जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

पीडित तरुणीने मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, सहा महिन्यांपूर्वी तिच्याच परिसरातील एका व्यक्तीने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला मयूरभंज जिल्ह्यातील बारीपदा येथे डांबून ठेवण्यात आले. या सहा महिन्यांच्या काळात विविध आरोपींनी तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केले आणि शारीरिक छळ केला.
advertisement

पीडितेची सुटका आणि तक्रार

पीडितेने मोठ्या हिमतीने आरोपींच्या तावडीतून पळ काढला आणि थेट भोगराई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. भोगराई पोलीस ठाण्याचे निरीक्षक रोहित कुमार बाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या आईने मार्च महिन्यामध्येच मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी मुलगी एका व्यक्तीसोबत पळून गेल्याचे आणि सोबत ३ लाख रुपयांचे दागिने घेऊन गेल्याचे तक्रारीत म्हटले होते. याच तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
advertisement

पोलीस तपास सुरू

सध्या पीडित तरुणीला बालासोर येथील महिला सुधार केंद्रात पाठवण्यात आले आहे. तसेच, बुधवारी तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
6 महिने डांबून ठेवलं, नराधमांनी 23 वर्षीय तरुणीच्या शरीराचे तोडले लचके, देशाला हादरवणारा सामूहिक अत्याचार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement