प्रेमाला नकार, तरुणीच्या कुटुंबासोबत रात्रीच्या सुमारास घडलं भयानक कांड
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली. गावातील एका तरुणाचे खोपानीकुची येथील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते.
कामरूप - गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर आल्या आहेत. तसेच एकतर्फी प्रेमातूनही तरुण-तरुणीचा काटा काढल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एकतर्फी प्रेमातून एका तरुणीच्या कुटुंबावर अॅसिड हल्ला करण्यात आला. खिडकीतून या कुटुंबावर हा अॅसिड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आई, मुलगी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गुवाहाटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
गावातील एक तरुण पुन्हा पुन्हा तरुणीला प्रेमाचा प्रस्ताव देत धमकी देत होता. मंगळवारी रात्री आरोपीने तरुणीच्या कुटुंबावर खिडकीतून अॅसिड फेकत हल्ला केला. खोपानीकुची याठिकाणी ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
एकतर्फी प्रेम अन् तरुणीला धमकी -
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली. आसाममधील हाजो परिसरातील हब्लाखा गावातील एका तरुणाचे खोपानीकुची येथील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला प्रेमाचा प्रस्ताव देऊन धमकीही दिली होती. तरुणाने दिलेल्या धमकीनंतर भीतीने ती तरुणी आपल्या घराऐवजी आपल्या आईसोबत मामाच्या घरात राहत होती.
advertisement
दरम्यान, मंगळवारी रात्री तिच्यावर, तिच्या आई, भावावर मामाच्या घरात अॅसिड हल्ला केला. कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात आई, मुलगी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Location :
Assam
First Published :
Oct 31, 2024 12:40 PM IST









