‘गे अॅप’वरून ओळख, रेल्वे पटरीजवळ बोलावलं अन्.., पुण्यात आणखी एका घटनेनं खळबळ
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Crime: पुण्यात ‘गे अॅप’च्या माध्यमातून ओळख वाढवून लुटमारीच्या प्रकारांत वाढ होत आहे. नुकतेच एका तरुणाला मारहाण करून लुटले आहे.
पुणे: सध्याच्या काळात ऑनलाईन गुन्ह्यांच्या प्रवाणात मोठी वाढ होत आहे. पुणे शहरात देखील गेल्या काही काळात ‘गे अॅप’च्या माध्यमातून ओळख वाढवून लुटमारीच्या घटना होत आहेत. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे. पिंपरीतील तरुणाला संगम पूल परिसरात बोलावून चार जणांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याच्याकडील साडेनऊ हजार रुपये लुटले. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तक्रारदार तरुणाच्या फिर्यादीवरून, शाहरुख टॉप आणि त्याचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 मार्च रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास हा प्रकार घडला. संगम पूल परिसरातील रेल्वे पटरीलगत असलेल्या मोकळ्या जागेत असा प्रकार झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
advertisement
लुटमारीचे सत्र कायम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीत राहणाऱ्या तरुणाची ओळख आरोपींशी एका ‘गे अॅप’वरून झाली होती. आरोपींनी त्याला मंगळवार पेठेतील आरटीओ चौकात भेटायला बोलावले. त्यानुसार तरुण त्या ठिकाणी भेटायला गेला. त्यानंतर संगम पूल परिसरात नेत धमकावून पैशांची मागणी केली. नकार दिल्यावर त्याला मारहाण करत डेबिट कार्ड, मोबाइल आणि दुचाकीची चावी लुटून आरोपी फरार झाले.
advertisement
2 महिन्यात 6 जणांना लुटले
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत अशाच पद्धतीने पाच ते सहा जणांना लुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धायरी भागातील एका व्यावसायिकासह, मगरपट्टा सिटी परिसरातील एका संगणक अभियंत्यासोबतही अशीच घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 25, 2025 12:03 PM IST