निळ्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह, बॉडीवर टाकलं मीठ, पत्नी अन् घरमालकाचा मुलगा फरार

Last Updated:

राजस्थानमध्येही निळ्या ड्रमचा एक भयानक प्रकार समोर आला आहे. इथं एका घराच्या छतावर निळा ड्रम आढळला आहे. ज्यात सडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे.

News18
News18
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला होता. इथं एका महिलेनं प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली होती. यानंतर निळ्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह टाकून वरून सिमेंट भरलं होतं. ही घटना ताजी असताना राजस्थानमध्येही निळ्या ड्रमचा एक भयानक प्रकार समोर आला आहे. अलवर जिल्ह्यातील आदर्श कॉलनीतील एका घराच्या छतावर निळा ड्रम आढळला आहे. ज्यात सडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह ड्रममध्ये टाकून वरून मिठाने झाकला होता.
advertisement
हंसराज उर्फ सूरज असं हत्या झालेल्या या ३५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील नवादिया नवाजपूर येथील रहिवासी होता. प्राथमिक तपासात हंसराजची गळा चिरून हत्या केली. यानंतर मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये टाकून मिठाने पुरला. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर घरमालकाचा मुलगा आणि मयताची पत्नी आणि त्याची तिन्ही मुलं घरातून गायब आहेत. त्यामुळे या हत्येबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
advertisement
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी घरमालकाची पत्नी काही कामासाठी छतावर गेली होती. तेव्हा तिला अचानक तीव्र वास जाणवला. सुरुवातीला तिला वाटले की कदाचित एखादा प्राणी मेला असेल, परंतु वास अधिक तीव्र झाल्यावर तिने आजूबाजूला शोध घेतला. तेव्हा तिची नजर निळ्या ड्रमवर पडली, ज्याच्या झाकणावर दगड ठेवण्यात आला होता. संशय वाढताच घरमालकाने ताबडतोब पोलिसांना बोलावले. उपअधीक्षक राजेंद्र सिंह त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. ड्रम उघडताच आतले दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला. आत मिठाने माखलेला एक मृतदेह पडला होता. एफएसएल टीमला बोलावण्यात आले आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले.
advertisement

दीड महिन्यांपूर्वी भाड्याने घेतलेले घर

मिळालेल्या माहितीनुसार, हंसराज किशनगड बास परिसरातील एका वीटभट्टीवर काम करायचा. सुमारे दीड महिन्यांपूर्वी त्याने आदर्श कॉलनीतील हे घर त्याच्या कुटुंबासाठी भाड्याने घेतले होते. कुटुंबात त्याची पत्नी आणि तीन लहान मुले होती. शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की हे जोडपे अनेकदा भांडत होते, परंतु अलिकडच्या काळात घरात काही विचित्र हालचाली सुरू होत्या. हंसराजची पत्नी, त्याची तीन मुले आणि घरमालकाचा मुलगा जितेंद्र हे हत्येच्या घटनेपासून बेपत्ता आहेत. यामुळे या हत्येत कुटुंबातील सदस्यांचा सहभाग असल्याचा संशय अधिकच वाढला आहे.
advertisement

धारदार शस्त्राने खून केल्याचा संशय

पोलिसांच्या मते, सुरुवातीच्या तपासात असे दिसते की हंसराजचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता. हत्येनंतर, मृतदेह एका ड्रममध्ये ठेवण्यात आला होता आणि त्यावर मीठ टाकण्यात आले, जेणेकरून तो लवकर कुजू नये आणि वास पसरू नये. तसेच ड्रमवर एक मोठा दगड ठेवण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून घरातून एक विचित्र वास येत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. वास असह्य झाल्यावरच हे रहस्य उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी घरमालकाची चौकशी केली आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
निळ्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह, बॉडीवर टाकलं मीठ, पत्नी अन् घरमालकाचा मुलगा फरार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement