advertisement

Solapur: इन्स्टावर स्टोरी ठेवली अन् थेट पोलिसांनाच दिलं आव्हान, सोलापुरात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांचा गेम ओव्हर!

Last Updated:

Solapur Police: सोलापुरात महामार्गावरील वाहनांना अडवून तीन दरोडेखोर पैसे उकळत होते. इन्स्टा पोस्टवरून पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या या दरोडेखोरांना अटक करण्यात आलीये.

चोराच्या उलट्या बोंबा; इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत चोरांनी दिलं पोलिसांना खुले आव
चोराच्या उलट्या बोंबा; इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत चोरांनी दिलं पोलिसांना खुले आव
सोलापूर- कोणताही आरोपी गुन्हा करून लपतो किंवा पळून जातो. रात्रीच्या वेळी महामार्गावर गाड्या अडवून लुटणाऱ्या दरोडेखोरांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले. पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच सोशल मीडियावर "मला पकडून दाखवा" असे स्टेट्स ठेवून खुले चॅलेंज दिले. सोलापूर पोलिसांनी देखील हे चॅलेंज स्वीकारून आरोपींना बेड्या ठोकल्या. चैतन्य ऊर्फ भैया पांडुरंग शेळके (वय 23 रा. भोत्रा, परांडा, धाराशिव), करण शिवाजी भोसले (वय 22 रा. खांडवी, बार्शी) व मारुती नागनाथ माने (रा. सुटका, भूम, धाराशिव) अशी तिघा आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 58 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, तीन वाहने असा एकूण 12 लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला आहे.
आरोपींचा शोध सुरू असताना स.पो.नि. नागनाथ खुणे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरेपाटील व अक्षय खांडवी यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली. चैतन्य शेळके रा. भोत्रा व करण भोसले रा. खांडवी, बार्शी हे दोघे देशी बनावटीचे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह बार्शीवरून सोलापूरला येणार होते. बार्शी तालुका हद्दीतील चोरलेल्या (दुचाकी क्रमांक MH 14 GA 4210) दुचाकीवरून ते येणार असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकाने सोलापूर - बार्शी जाणाऱ्या रोडवरील कारंबा गावाच्या पुढे वाहन रोडच्या कडेला एका झाडाखाली उभे केलेले दिसले.
advertisement
पोलिसांनी लगेच आरोपी चैतन्य ऊर्फ भैय्या पांडुरंग शेळके व करण भोसले यांना बार्शी रोडवरील कारंबा येथे पकडले. त्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसे व चोरीतील कार मिळाली. त्यांनी कुर्डूवाडी ते बार्शी रोडवर कारचालकाला पिस्टलचा धाक दाखवून लुटले होते व त्याची सोन्याची लॉकेटही काढून घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर आरोपींना मारुती माने यांनी गावठी पिस्टल विकले होते.
advertisement
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बार्शी तालुका पोलीस ठाणे, करमाळा, कामती, कुर्डूवाडी, वैराग, बार्शी शहर, तुळजापूर पोलीस ठाणे येथील प्रत्येकी एक असे 4 जबरी चोरीचे, 3 वाहन चोरीचे व 1 आर्मस् अ‍ॅक्ट असे 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Solapur: इन्स्टावर स्टोरी ठेवली अन् थेट पोलिसांनाच दिलं आव्हान, सोलापुरात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांचा गेम ओव्हर!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement