खोलीमधून येत होता दुर्गंध पोलिसांनी दार उघडताच बसला धक्का; अमरावतीमधील घटनेनं खळबळ!

Last Updated:

माणुसकीला काळीमा फासणारी घटना अमरावती जिल्ह्यतील मोर्शीमधून समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

News18
News18
अमरावती, 5 सप्टेंबर, संजय शेंडे :  माणुसकीला काळीमा फासणारी घटना अमरावती जिल्ह्यतील मोर्शी येथे घडली आहे. संशयातून पोटच्या गोळ्याने आपल्या आई आणि भावाची हत्या केली आहे. या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला हैदराबादमधून अटक केली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मोर्शी शहरातील शिवाजीनगरमध्ये कापसे कुटुंब राहाते. कुटुंबात आई आणि दोन मुलं होते.  पती नसल्याने सर्व जबाबदारी आई निलीमा कापसे यांच्यावरच होती. निलिमा कापसे या शासकीय कार्यालयात काम करून घर चालवत होत्या.   संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना, निलिमा कापसे यांचा मुलगा सौरभला आपल्या आईचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने आपल्या आई आणि भावला संपवण्याचा कट रचला.
advertisement
आरोपीनं खाण्याच्या भाजीमध्ये धोत्रा या विषारी वनस्पतीच्या बिया टाकल्या. विषारी बियांमुळे आई आणि त्याच्या भावाची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याने दोघांना घरीच सलाईन लावले. या सलाईनमध्ये त्याने इजेक्शनच्या मदतीनं गुंगीच्या औषधांचा ओव्हरडोस सोडला. औषधांच्या ओव्हरडोसमुळे झोपेतच त्याच्या आईचा आणि भावाचा मृत्यू झाला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्यांच्या मृत्यूची खात्री झाल्यानंतर त्यांचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून दिवानमध्ये टाकला. त्यानंतर तो घराला कुलूप लावून घराबाहेर पडला. दरम्यान आठ दिवसांनंतर घरातून दुर्गंधी आल्यानं स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीनं घर उघडलं. समोरचं दृष्य पाहिल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.
advertisement
घटना समोर येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सौरभचा मोबाईल बंद असल्यानं पोलिसांचा त्याच्यावर संशय होता. पोलिसांनी सौरभला हैदराबाद येथून अटक केली. पोलीस चौकशीमध्ये त्यानं हत्येची कबुली दिली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
खोलीमधून येत होता दुर्गंध पोलिसांनी दार उघडताच बसला धक्का; अमरावतीमधील घटनेनं खळबळ!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement