WhatsApp Fraud Call: तुमच्या WhatsApp वर 'या' नंबरवरून कॉल आला तर सावध व्हा; धोक्याचा इशारा जारी
- Published by:Rahul Punde
Last Updated:
WhatsApp Fraud Call: तुम्हाला जर WhatsApp वर +92 या क्रमांकावरुन फोन आला तर सावध व्हा. कारण, तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसल्याची शक्यता आहे.
मुंबई : इंटरनेटची व्याप्ती वाढली तसा गुन्हेगारांनी आपला मोर्चा आता ऑनलाईन फ्रॉडकडे वळवला आहे. वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. नुकतेच दूरसंचार विभागाने (DoT) WhatsApp वरील फ्रॉड कॉल्सबाबत लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दूरसंचार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लोकांना कम्युनिकेशन विभागाच्या नावाने फसवणूकीचे कॉल येत आहेत. ज्यामध्ये नंबरचे डिटेल्स माहिती न दिल्यास फोन क्रमांक बंद करण्याची धमकी दिली जाते.
हे फ्रॉड कॉलर काही बेकायदेशीर कामांसाठी त्यांच्या नंबरचा गैरवापर होत असल्याचे सांगून मोबाईल वापरकर्त्यांना ब्लॅकमेल करतात. हे सीबीआयच्या नावाने होत असलेल्या सायबर गुन्ह्यासारखेच आहे, जिथे गुन्हेगार स्वत:ला सीबीआय अधिकारी सांगतो आणि त्यांच्या नावावर काही बेकायदेशीर पॅकेट मिळाल्याचा दावा करतात आणि त्यांना नजरकैदेत ठेवतात.
'धोकादायक' व्हॉट्सॲप नंबर
कम्युनिकेशन विभागाने परदेशातील मोबाइल नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल्सबाबत एक सूचनाही जारी केली आहे. हा क्रमांक +92-xxxxxxxxxx अशा डिजीटने सुरू होतो. सरकारी अधिकारी असल्याचे भासवून ते लोकांची आर्थिक फसवणूक करतात.
advertisement
फसवणूक कशी होते?
दूरसंचार मंत्रालयाने मोबाईल वापरकर्त्यांना इशारा दिला आहे की, सायबर गुन्हेगार अशा कॉलद्वारे सायबर गुन्ह्यांमध्ये आर्थिक गंडा घालतात. गुन्हेगार तुमच्याशी सरकारी अधिकारी असल्यासारखे बोलतील. ते तुम्हाला धमकावून तुमची वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात.
कोणाशीही माहिती शेअर करू नका
पुढे म्हटले आहे की दूरसंचार विभाग कोणत्याही नागरिकाला कॉल करण्यासाठी अधिकृत नाही. लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे कॉल आल्यावर कोणतीही माहिती शेअर करू नका, असंही यात म्हटलं आहे.
advertisement
अशा फसवणुकीची तक्रार कशी आणि कुठे करावी?
दूरसंचार विभागाने (DoT) नागरिकांना असे घडल्यास तक्रार करण्याचे आवाहन केलं आहे. तुम्ही संचार साथी पोर्टलच्या (www.sancharsathi.gov.in) ‘चक्षु-रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन्स’ सुविधेवर फसवणूक कॉलची तक्रार करू शकता. यामुळे दूरसंचार विभागाला सायबर गुन्हे, पैशांची फसवणूक इत्यादी रोखण्यात मदत होते.
advertisement
तुमच्या नावावर सिम ॲक्टिव्हेट आहे की नाही हे तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.
याशिवाय, नागरिक त्यांच्या नावातील मोबाईल कनेक्शन संचारी साथी पोर्टलच्या (www.sancharsathi.gov.in) फीचरवर 'तुमचे मोबाईल कनेक्शन जाणून घ्या' या फीचरवर तपासू शकतात. येथे तुम्ही न घेतलेल्या किंवा आवश्यक नसलेल्या कोणत्याही मोबाइल कनेक्शनची तक्रार करू शकतात.
सायबर तक्रार कुठे कराल?
दूरसंचार विभागाने नागरिकांनी सायबर गुन्हे किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 08, 2024 6:31 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
WhatsApp Fraud Call: तुमच्या WhatsApp वर 'या' नंबरवरून कॉल आला तर सावध व्हा; धोक्याचा इशारा जारी