ज्याने पाडला रक्ताचा सडा, त्याच्याच प्रेमात वेडी झाली महिला; शेवट झाला थरकाप उडवणारा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरात असे अनेक लोक आहेत जे लोकांची खूप मदत करतात. लोकांची मदत करुन त्यांना त्यातून समाधान मिळतं. मात्र बऱ्याचदा मदत करणं काहींना महागात पडतं.
नवी दिल्ली : जगभरात असे अनेक लोक आहेत जे लोकांची खूप मदत करतात. लोकांची मदत करुन त्यांना त्यातून समाधान मिळतं. मात्र बऱ्याचदा मदत करणं काहींना महागात पडतं. लोकांचा चांगला विचार करुन त्यांच्यासोबतच वाईट होतं. असंच एका तरुणीसोबत झालं. तरुणी एका मारेकऱ्याच्या प्रेमात पडली. ती त्याला चांगला माणूस बनवणार होती मात्र तिच्यासोबत भयंकर घडलं.
प्रेमात लोक काहीही करु शकतात. एका तरुणीनंही असंच केलं. एक मुलगा तिच्यावर प्रेम करायचा आणि तिलाही तो आवडायचा. मात्र तो मुलगा एक हत्यारा होता. तरीही तिनं त्याच्यावर प्रेम करायचं ठरवलं. तिला वाटलं की ती त्याला सुधारु शकते आणि चांगला माणूस बनवू शकते. मात्र हत्याऱ्या प्रियकऱ्यानं तिच्यासोबत जे केलं ते खूपच थरारक होतं.
advertisement
1998 साली 17 वर्षाच्या जोसफ ओबरहैंसलीनं आपल्याच प्रेमिकाला मारलं. जेव्हा जोसफच्या आईला समजलं त्याची प्रेमिका प्रेग्नंट आहे तर त्यांनी तिला त्यांच्याच घरात कुटुंबासारखं ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र जोसफला ही गोष्ट आवडली नाही. जेव्हा त्यांचं बाळ जन्माला आलं तेव्हा त्यानं तिच्यावर चीट केल्याचा आरोप लावला आणि तिला त्रास द्यायला लागला. मग त्याची प्रेमिका सब्रीनाने पोलीस तक्रार केली. जोपर्यंत पोलीस पोहचेल तो पळून गेला होता. जेव्हा तो घरी परतला तर त्याचं वागणं बदललेलं होतं. तो नशेत असल्याचं वाटायचं. त्याच्याकडे बंदूकही होती. त्यानं वेड्यासारखी ती बंदूक चालवली. त्याची आई घाबरुन पळून जायला लागली तर त्यानं आईच्या पाठी गोळ्या घातल्या. त्याची बहिण त्याच्या मुलाला वाचवून घेऊन गेली. मग त्यानं सब्रिनाच्या डोक्यात पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा जीव वाचला. या गुन्ह्यात त्यासा 15 वर्षांची शिक्षा मिळाली. त्यातील 12 वर्ष शिक्षा भोगून तो बेलवर सुटला.
advertisement
त्यानंतर जोसेफची भेट टैमीसोबत झाली. टैमी त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी होती. दोघांची मैत्री झाली आणि मग प्रेमही. तिला वाटलं तिचं प्रेम कदाचित जोसफला सुधारु शकेल. त्यामुळे तिने त्याला सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यानं जोसफ टैमीलाही मारहाण करु लागला. टैमी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली तेव्हा तिचा पूर्ण सुजला होता. मग ऑफिसवाल्यांनीच जोसफविषयी तक्रार केली. मग टैमीनं जोसफला घरातून हाकललं. त्याचं सामानही बाहेर फेकलं आणि घर लॉक केलं. जोसफनं तिच्या घरात घुसण्याचा पुन्हा प्रयत्न केला.
advertisement
दरम्यान, घडलं असं की टैमी ऑफिसला आली नाही तर सगळेच चिंतेत पडले. त्यांनी पोलीसांना कळवलं. पोलीस घरी पोहोचली तर त्यांना जे दिसलं ते हादरवणारं होतं. टैफीच्या घरातील बाथटबमध्ये रक्त होतं तिचा हृदय, डोकं काढलेली होती. पोलिसांना हा डोक्याचा भाग काळीज तव्यावर दिसलं. जोसफला ताब्यात घेतल्यावर त्यानं कबूल केलं की त्यानं टैमीचं डोक्याचा भाग फ्राय करुन खाल्ला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 11, 2024 7:29 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ज्याने पाडला रक्ताचा सडा, त्याच्याच प्रेमात वेडी झाली महिला; शेवट झाला थरकाप उडवणारा