तुळजापूर अमली पदार्थ रॅकेट: मास्टरमाइंड महिलेकडं सापडलं कोट्यवधींचं घबाड, आकडे पाहून पोलीस चक्रावले!

Last Updated:

Tuljapur Crime News: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेच्या खात्यात पोलिसांना मोठं घबाड सापडलं आहे

News18
News18
तुळजापूर: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेच्या खात्यात पोलिसांना मोठं घबाड सापडलं आहे. पोलिसांनी आरोपी महिला संगीता गोळेचं बँक खातं गोठावलं आहे. तसेच पोलिसांनी आरोपी महिलेकडून पाव किलो सोनंही जप्त केलं आहे. महिलेच्या खात्यावर जे पाच कोटींचे व्यवहार झाले, ते व्यवहार नेमके कुठून झाले, याचा स्त्रोत नक्की काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. शिवाय हा पैसा ड्रग्ज तस्करीतून मिळवला आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
काही दिवसांपूर्वा पोलिसांनी तुळजापूरात एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणात तीन जणांना रंगेहाथ पकडलं होतं. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे, युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड अशी या तीन आरोपींची नावं आहे. तिघांनाही तालमवाडी याठिकाणी अमली पदार्थांसह अटक करण्यात आले होते.
advertisement
या तिघांची चौकशी केली असता, या आरोपींना मुंबई येथील महिला संगीता गोळे अमली पदार्थ पुरवत असल्याची माहिती मिळाली. तसेच संगिता गोळे हिला स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे, संतोष खोत, तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हेही मदत करत असल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं. यानंतर पोलिसांनी या सर्वांना तुळजापूर अमली पदार्थ प्रकरणात सहआरोपी केलं. यानंतर फरार झालेल्या तीन स्थानिक आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
advertisement
आता या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला संगीता गोळेचे बँक व्यवहार तपासले असता तिच्या खात्यावरून तब्बल पाच कोटींचे व्यवहार झाल्याचे उघडकीस आलं आहे. यानंतर पोलिसांनी संगीता गोळेचं बँक खातं सील केलं. तसेच पाव किलो सोनंही पोलिसांनी जप्त केलं आहे. आरोपी महिलेच्या मुंबईसह लोणावळ्यात मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 16 आरोपी करण्यात आले आहेत. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
तुळजापूर अमली पदार्थ रॅकेट: मास्टरमाइंड महिलेकडं सापडलं कोट्यवधींचं घबाड, आकडे पाहून पोलीस चक्रावले!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement