आई जगदंबेच्या तुळजापुरात चाललंय काय? लॉजमध्ये चालयचं मटका बुकीचे रॅकेट, बडे मासा गळाला

Last Updated:

विनोद गंगणेसह ड्रग्स प्रकरणात कारवाईची मागणी करणारे काँग्रेसचे अमोल कुथवळ सचिन पाटील हे मटका बुकीचे मालक असल्याचे निष्पन्न झाले.

News18
News18
बालाजी निरफळ, प्रतिनिधी
तुळजापूर : ड्रग्स प्रकरणा नंतर आता तुळजापूरमध्ये मटका बुकीचे रॅकेटचा पर्दाफाश झाला. तुळजापुरात अवैधरित्या चालणाऱ्या मटका अड्डयावर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः जाऊन छापा मारत ही कारवाई केली आहे. 33 जणांवर गुन्हा दाखल करत लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी या लॉजवर असल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मिळाली होती त्यानुसार त्या कारवाईसाठी मोठा फौज फाटा घेऊन पोलीस गेले होते. मात्र तिथे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नसून मटका बुकिंग व्यवसाय चालत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्या हॉटेलचे दरवाजे तोडून ही कार्यवाही केली आहे. यात ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद गंगणेसह ड्रग्स प्रकरणात कारवाईची मागणी करणारे काँग्रेसचे अमोल कुथवळ सचिन पाटील हे मटका बुकीचे मालक असल्याचे निष्पन्न झाले.  काँग्रेस पक्षाचे नेते अमोल कुतवळ सचिन पाटील यांच्या सह अनेक बडे मासे गळाला लागेले आहेत.
advertisement

33 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर असा एकूण 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 33 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून अवैध धंद्यांविरोधात पोलिसांच्या कठोर भूमिकेचे दर्शन घडले आहे.

रॅकेटमध्ये कमिशनवर काम करणारे अनेक एजंट

advertisement
चौकशीदरम्यान, विक्रम नाईकवाडी याने आपण स्वतः, चैतन्य मोहनराव शिंदे (रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर), अमोल माधवराव कुतवळ (रा. रावळ गल्ली, तुळजापूर), सचिन पाटील (रा. रावळ गल्ली, तुळजापूर) आणि विनोद विलास गंगणे (रा. जिजामाता नगर, तुळजापूर) हे या मटका बुकीचे मालक असल्याचे कबूल केले. तसेच, या रॅकेटमध्ये कमिशनवर काम करणारे अनेक एजंट असल्याचेही उघड झाले आहे. राम मांगडे, विजय निंबाळकर, ज्ञानेश्वर जाधव, संतोष जगताप, मोहन मोहरकर, कृष्णा काळे, मिथुन पोकळे, अजाज शेख, राम हरी मस्के, हसन नाईकवाडी, संतोष रोकडे, कुलदिप गरड, अक्षय खराडे, गाढवे सर, विंकी पोकळे, सुभाष पारवे, सागर शिंदे, शुभम क्षिरसागर, अंबादास राशीनकर, श्रावण जाधव आणि जिवन बोबडे यांचा एजंट म्हणून समावेश आहे. हे एजंट व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे मटक्याचे आकडे आणि पैसे गोळा करत होते.
advertisement

आंतरजिल्हा कनेक्शन?

या टोळीचे धागेदोरे सांगोला, मोहोळ आणि वडाळा येथील फिरत्या एजंटपर्यंत पोहोचल्याच तपासात निष्पन्न झाले आहे. अशपाक खलील मुलानी, गणेश बापुसाहेब देशमरत भाणि तात्या करम दे या फिरत्या एजंटमध्ये हा खेळ खेळला जात असल्याचं उघड झाले असून त्याचा तपास पोलीस करत आहेत
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
आई जगदंबेच्या तुळजापुरात चाललंय काय? लॉजमध्ये चालयचं मटका बुकीचे रॅकेट, बडे मासा गळाला
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement