Virar News : बेपत्ता पेट्रोलपंप मालकाचा मृतदेह आढळला त्यांच्याच गाडीत; चालक फरार झाल्याने गूढ वाढलं

Last Updated:

Virar News : विरारमध्ये पेट्रोलपंप मालकाचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे.

News18
News18
विरार, (विजय देसाई, प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसा घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे महाराष्ट्र ढवळून निधाला आहे. एकीकडे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे विविध गुन्ह्यांची संख्याही वाढत चालली आहे. विरारमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. विरार पूर्वेकडील चंदनसार येथील पेट्रोलपंपाचे मालक रामचंद्र खकराणी (75) यांचा मृतदेह सोमवारी दुपारी मुंबई अहमदाबाद महामार्गावर त्यांच्याच गाडीत आढळून आला आहे. रविवार रात्रीपासून ते बेपत्ता होते. त्यांच्या चालकाने ही हत्या केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.
पेट्रोलपंप चालकाची कोणी केली हत्या?
उल्हासनगर येथे राहणारे रामचंद्र खकराणी (वय 75) यांचा विरारच्या चंदनसार येथे पेट्रोलपंप आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते व्यवस्थापकाकडून 50 हजार रुपये घेऊन घरी येण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा नेहमीचा चालक मुकेश खुबचंदानी (54) हा होता. मात्र खकराणी घरी पोहोचले नाही. त्यांच्या मुलाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खकराणी आणि चालक मुकेश खुबचंदानी या दोघांचे फोन बंद येऊ लागले. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
advertisement
वाचा - ट्रेनी डॉक्टरचा आधी गळा दाबला, नंतर बलात्कार; त्या रात्री संजय रॉयने काय केलं?
सोमवारी दुपारी रामचंद्र खाकराणी यांचा मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडीत आढळून आला आहे. गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चालक मुकेश खुबचंदानी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Virar News : बेपत्ता पेट्रोलपंप मालकाचा मृतदेह आढळला त्यांच्याच गाडीत; चालक फरार झाल्याने गूढ वाढलं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement