दवाखान्यात चला म्हणणाऱ्या पत्नीवर पतीचे कुऱ्हाडीने वार, नंतर गळ्याला लावला दोर; वाशीम हादरलं
- Reported by:Kishor Gomashe
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नवऱ्याला दारूचे व्यसन लागल्याने पती- पत्नीमध्ये कायम खटके उडत होते.
वाशिम: वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनं पत्नीची धारधार शस्त्राने हत्या केली अन् त्यानंतर .तर स्वत: गळफास घेतल्याचे समोर आले आहे. हिंमत धोंगडे असे पतीचे नाव आहे. तर कल्पना धोंगडे असे पत्नीचे नाव आहे.या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
आई वडिलांच्या मृत्युमुळे त्यांची तीन मुले पोरकी झाली आहेत. हिंमत धोंगडे यांचा संसार सुरळीत चालू होता. मात्र हिंमत हा मागील काही महिन्यांपासून व्यसनाच्या आधीन गेल्यामुळे त्याचे पत्नी कल्पनासोबत नेहमी वाद होत होते. दोघे ही पती पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांना मोठी 11 वर्षांची मुलगी,दुसरी मुलगी वय 9 वर्षे आणि लहान मुलगा 7 वर्षाचा आहे. कुटुंबाचा खर्च ही वाढला होता त्यामुळे हिंमत हा नेहमी चीड चीड करत असे त्यातच त्याला चिंता सतावत असल्याने तो कायम कोणत्यातरी विचारत असायचा. त्यामुळे कुटुंबाने त्याच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
राग अनावर झाला अन्...
सोमवारी (८ सप्टेंबर) हिंमतवा आज दवाखान्यात दाखविण्यासाठी त्याच्या भावाने घराबाहेर ऑटो रिक्षाही आणली होती. मात्र हिंमत जाण्यासाठी विरोध केला. मात्र पत्नीने त्याला जाण्यासाठी तगादा लावल्याने त्याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात पतीने कुऱ्हाडीने पत्नीच्या गळ्यावर आणि डोक्यात वार केले. त्यामुळं पत्नी कल्पना धोंगडे लगेच रक्ताच्या थारोळ्यात पडली. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने पत्नीचा जीव गेला. पत्नीची हत्या केल्यानंतर हिंमतने ही घरातच गळफास घेत आत्महत्या केली.
advertisement
तीन मुलं आई वडिलांच्या प्रेमाला पोरकी
पती पत्नीच्या मृत्यूमुळे त्यांची तीन मुलं आई वडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली आहेत.या घटनेनंतर कोठारी परिसरात हळहळ व्यक्त होत असून मंगरुळपीर पोलीस पुढील तपास करत आहेत. केवळ क्षुल्लक कारणावरून राग आल्यानं ही दुर्दैवी घटना घडली आहे.
view commentsLocation :
Washim,Maharashtra
First Published :
Sep 08, 2025 7:12 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
दवाखान्यात चला म्हणणाऱ्या पत्नीवर पतीचे कुऱ्हाडीने वार, नंतर गळ्याला लावला दोर; वाशीम हादरलं










