advertisement

लघवीला आल्याचं सांगत आरोपी पतीला घेऊन पत्नी फरार; पोलिसांच्याच हातावर दिल्या तुरी, पुढे काय घडलं?

Last Updated:

चंदन मंडल याला उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दारू तस्करीप्रकरणी कासद गावातून अटक केली होती. आरोपी गाडी घेऊन कासद गावातून जात होता. यावेळी त्याला रस्त्यातच पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर तो पळून जायचा प्रयत्न करत होता.

 प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
विक्रम कुमार झा, प्रतिनिधी
पूर्णिया : महिलेने निर्णय घेतला तर ती काहीही करू शकते, भलेही या घटनेचे परिणाम काहीही असोत. पण महिलेने ठरवले तर ती घेतलेला निर्णय पूर्ण करतेच. अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू तस्करीप्रकरणी तरुणाला अटक झालेली असताना 3 पोलिसांना फसवून आरोपीच्या पत्नीने आरोपीला घेऊन फरार झाली.
नेमकं काय घडलं -
बिहारच्या पूर्णियामध्ये मंगळवारी ही घटना घडली. दारू तस्करी प्रकरणात पोलिसांना चकमा देत पूर्णिया मेडिकल कॉलेजमध्ये भरती झालेल्या आरोपीला त्याच्या पत्नीने घेऊन पळ काढला. केहाट पोलीस ठाण्याचे प्रभारी कौशल कुमार यांनी सांगितले की, अररियाचे उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस पोलीस ठाण्यात आले होते.
advertisement
ते वैद्यकीय महाविद्यालयातून फरार झालेल्या आरोपीची माहिती देत ​​होते. मात्र, या लोकांनी अद्याप पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिलेला नाही. तर दुसरीकडे, आरोपी फरार झाल्यानंतर चार तासात आरोपीला त्याच्या पत्नीसह अररिया येथूनच अटक करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अररिया जिल्ह्यातील बरदाहा पोलीस ठाणे हद्दीतील ठेंगापूर पिपरा येथील रहिवासी चंदन मंडल याला उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दारू तस्करीप्रकरणी कासद गावातून अटक केली होती. आरोपी गाडी घेऊन कासद गावातून जात होता. यावेळी त्याला रस्त्यातच पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर तो पळून जायचा प्रयत्न करत होता. तितक्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उपचारासाठी पोलिसांनी त्याला पूर्णिया मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. मात्र, तेथून ते त्याच्या पत्नीच्या मदतीने फरार झाला.
advertisement
लघवी करण्याच्या बहाण्याने -
सर्जिकल वार्डातील एका रुग्णाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जखमी आरोपीला बेड क्रमांक-1 वर दाखल करण्यात आले होते. तर त्याच्या सुरक्षेसाठी तैनात उत्पादन शुल्क विभागाचे तीन पोलीस बाहेर पहारा देण्याच्या नावाखाली आपसात गप्पा मारत होते. त्यावेळी जखमी आरोपी बेडवर पडलेला होता. त्यामुळे त्याला बेड्या ठोकल्या नव्हत्या. याचाच फायदा घेत त्याच्या पत्नीने त्याला लघवी करण्याच्या बहाण्याने शौचालयात नेले आणि दोघांनी तिथून पळ काढला.
advertisement
बराच वेळ ते जेव्हा दोन्ही परतले नाही तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता ते खूप दूर निघून गेले होते. मात्र, शेवटी चार तासांनी पोलिसांनी त्यांना पकडले. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
लघवीला आल्याचं सांगत आरोपी पतीला घेऊन पत्नी फरार; पोलिसांच्याच हातावर दिल्या तुरी, पुढे काय घडलं?
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement