Akaay Virat : मोठं नाव कमवणार विराट-अनुष्काचा मुलगा; ज्योतिषांनी सांगितलं अकायचं भविष्य
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सोशल मीडियावर त्यांचे चाहते विराट आणि अनुष्काचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. मात्र, ज्या दिवशी विराटच्या मुलाचा जन्म झाला, तो दिवस नेमका कसा होता, ग्रह नक्षत्रांची स्थिती त्यादिवशी काय होती, त्या दिवसाचा प्रभाव नेमका काय आहे, हे जाणून घेऊयात.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधारी आणि जगातील एक स्फोटक फलंदाज विराट कोहली हा दुसऱ्यांदा वडील बनला आहे. 15 फेब्रुवारीला अनुष्का शर्माने एका बाळाला जन्म दिला. याबाबतची माहिती विराट आणि अनुष्का शर्मा यांनी सोशल मीडियावर दिला आहे. यानंतर विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.
सोशल मीडियावर त्यांचे चाहते विराट आणि अनुष्काचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. मात्र, ज्या दिवशी विराटच्या मुलाचा जन्म झाला, तो दिवस नेमका कसा होता, ग्रह नक्षत्रांची स्थिती त्यादिवशी काय होती, त्या दिवसाचा प्रभाव नेमका काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
ज्योतिष शास्त्रात ग्रह नक्षत्र आणि राशीफळाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. सनातन धर्मात जेव्हा कुणाचा जन्म होतो, तेव्हा लग्न मुहूर्त आणि ग्रह नक्षत्रांची स्थिती खूप महत्त्वाची मानली जाते. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी अत्यंत शुभ दिवस होता या दिवशी अनुष्का शर्माने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी सांगितले की, 15 तारखेला शुक्ल पक्षा सप्तमी तिथी होती. वार गुरुवार होता आणि यादिवशी नक्षत्राचा स्वामी शुक्र आणि राशीचा स्वामी मंगळ ग्रह होता. याशिवाय लग्नात केतु विराजमान होता. अशा स्थितीत यादिवशी ज्या बाळाचा जन्म होतो ते बाळ खूप रहस्यमय आणि भाग्यशाली मानले जाते.
advertisement
अकाय नावाचा अर्थ काय -
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आपल्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे. पंडित कल्कि राम यांनी सांगितले की, धार्मिक ग्रंथानुसार, अकायचा अर्थ निराकार असा होतो. म्हणजे भगवान विष्णुपासून अकाय या शब्दाची निर्मिती झाली. धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमेच्या चंद्रालालाही अकाय असे म्हणतात. हे नाव मेष राशीमध्ये येत असून शौर्य आणि पराक्रमात वाढ करते.
advertisement
एकरी 5 लाखांचे उत्पन्न, शेतकऱ्याने शेतात लावले CCTV कॅमेरे, नेमका काय आहे हा प्रकार?
अयोध्याचे ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी सांगितले की, 15 फेब्रुवारीचा तो दिवस बाळाचे सौभाग्य आणि रहस्यमय जीवन दर्शवितो. अनुष्का शर्माचा मुलगा खूप हुशार असेल. आपल्या बुद्धिमत्तेने आणि विवेकाने तो विरोधकांचा पराभव करेल. हे बाळ आई-वडिलांसह देशाचा गौरव वाढवेन. शुक्र आणि मंगळ या देवतांनी अलंकित झालेले हे बाळ त्याचे वडील विराट कोहली याच्याही पुढे अनेक पट देशाचा गौरव वाढवेन.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी चर्चा केल्यानंतर लिहिली आहे. याबाबत लोकल-18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
February 21, 2024 9:45 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Akaay Virat : मोठं नाव कमवणार विराट-अनुष्काचा मुलगा; ज्योतिषांनी सांगितलं अकायचं भविष्य