एकरी 5 लाखांचे उत्पन्न, शेतकऱ्याने शेतात लावले CCTV कॅमेरे, नेमका काय आहे हा प्रकार?
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
छिंदवाडा : शेतामध्ये शेतकरी आपल्या शेतमालाची, पिकांचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस काळजी घेत असतो. अनेकदा शेतात शेतमालाची काळजी घेण्यासाठी, रक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रपाळीही करतो. शेतात रात्री मजूरही असतात. यातच आता एका शेतकऱ्याने शेतात कॅमेरे लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
सध्या देशभरात लसणाचे भाव गगनाला भिडले आहेत. केवळ खरेदीदारच नाही तर शेतकऱ्यालाही लसणाची चिंता आहे. लसणाच्या वाढत्या किमतीमुळे शेतातून लसणाची चोरी होऊ शकते, अशी भीती शेतकऱ्यांना आहे, त्यामुळे शेतकरी आता शेतातच सुरक्षा व्यवस्था करताना दिसत आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून नुकतीच एक अनोखा घटना समोर आली आहे.
कोणीही लसूण पिकाची चोरी करू नये म्हणून याठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या लसणाच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत आणि काही मजूरही तैनात केले आहेत. छिंदवाडा येथील मोहखेड भागातील सांवरी येथे शेतकऱ्यांनी शेताच्या निगराणीसाठी त्यांच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे शेतात उगवलेली पिके आणि शेतात काम करणाऱ्या मजुरांवर लक्ष ठेवले जात आहे. लसूण पिकाच्या कापणीनंतर हे कॅमेरे शेतातून काढले जाणार आहेत.
advertisement
Inspiring News : आधी पतीचा मृत्यू, नंतर आईचीही साथ सुटली, पण मनीषाने करुन दाखवलं! ही प्रेरणादायी गोष्ट वाचायलाच हवी
शेतकरी राहुल देशमुख यांनी सांगितले की, शेतात सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केल्याने लसणाची चोरी वाचवता येऊ शकते. शेतात काम करणाऱ्या मजुरांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा स्थितीत चोरी किंवा कोणतीही दुर्घटना घडली तर ते बघता येते. यावेळी लसणाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. किमान एक एकरातून पाच लाखांचे उत्पन्न मिळते, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
तर शेतकऱ्यांच्या शेतात कॅमेरे लावणारे गजानंद देशमुख यांनी सांगितले की, काही वस्तू महाग झाल्या तर चोरी आणि नुकसान होण्याची भीती असते. एका शेतकऱ्याला लसूण चोरी होण्याची भीती असल्याने त्यांच्या आदेशानुसार शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. याचा शेतकऱ्याला चांगला लाभ झाला असून शेतात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. तसेच घरी बसून मजूरांवर नजर ठेवली जाऊ शकते. हा फायदा पाहिल्यानंतर इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. इतर तीन ते चार शेतकऱ्यांनीही त्यांच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Location :
Madhya Pradesh
First Published :
February 21, 2024 8:50 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
एकरी 5 लाखांचे उत्पन्न, शेतकऱ्याने शेतात लावले CCTV कॅमेरे, नेमका काय आहे हा प्रकार?