Inspiring News : आधी पतीचा मृत्यू, नंतर आईचीही साथ सुटली, पण मनीषाने करुन दाखवलं! ही प्रेरणादायी गोष्ट वाचायलाच हवी

Last Updated:
मनीषा दीक्षित
मनीषा दीक्षित
सिमरनजीत सिंह, प्रतिनिधी
शाहजहांपुर : आयुष्यात प्रत्येक दिवशी संघर्ष आहे. पण मी आयुष्यात प्रत्येक दिवशी जिद्दीने उभा राहीन आणि माझ्या स्वप्नांच्या दिशेने प्रामाणिकपणे मेहनतीने वाटचाल करेन, या विचाराने काही जण आयुष्यात जगत असतात. आज अशाच एका तरुणीचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत.
मनीषा दीक्षित असे या तरुणीचे नाव आहे. आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत ती जिद्दीने उभी राहत ती आज एका मोठा टप्पा गाठला आहे. त्यांच्या हातात अशी कलात्मक जादू आहे, ज्यामुळे तिला कलाक्षेत्रातील अखिल भारतीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
advertisement
मनीषा ही उत्तरप्रदेशातील शाहजहांपुर येथील रहिवासी आहे. बालपणापासून तिला चित्रकलेची आवड होती. तिचा जन्म 1993 मध्ये उत्तरप्रदेशातीलच अयोध्येत झाला होता. तिचे सुरुवातीचे शिक्षण हे अयोध्येतूनच झाले. मनीषाला पेंटिंग म्हणजे चित्रकलेची आवड होती. यानंतर तिने यातच करिअर करायचे ठरावले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने बरेली महाविद्यालयातून 2014 साली ड्रॉइंग आणि पेंटिंग मध्ये एमएचे शिक्षण पूर्ण केले.
advertisement
शिक्षण पूर्ण झाल्यावर 2017 मध्ये तिचे लग्न झाले. मात्र, दुर्दैवाने लग्नाच्या 2 वर्षांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर मनीषाला मोठा धक्का बसला आणि ती आपल्या माहेरी परतली. पण थोडा वेळ गेल्यानंतर तिने पुन्हा आपल्या हिंमतीने उभे राहत आपल्यातली कला जिवंत ठेवली. त्यांच्या आईनेही त्यांना मदत केली. पण मनीषा पुन्हा एकदा तिच्या पायावर उभी राहिली असताना तिच्या आयुष्यात आणखी एक दुर्दैवी घटना घडली. 2021 मध्ये त्यांच्या आईचेही निधन झाले.
advertisement
career in acting : तुम्हालाही व्हायचंय अभिनेता, मग 12 वी पासूनच याठिकाणी घ्या admission
आईच्या निधनानंतर पुन्हा एकदा मनीषा जिद्दीने उभी राहिली आणि यानंतर आता कला क्षेत्रात तिने एकाहून एक सुंदर अशी चित्रे काढली आहेत. तिने काढलेली अनेक चित्रे ही देशातील अनेक आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. 2021 मध्ये तिला ऑल इंडिया अवार्डनेही सन्मानित करण्यात आले.
advertisement
आता कला हेच माझे कुटुंब आणि माझी जीवनसोबती आहे. कलेशिवाय काहीही नाही, असे मनीषा सांगते. सध्या ती लखनऊ येथील ललित कला अकदमी येथे कार्यरत आहे. तसेच आपल्या कलेची आवड जोपासत आहे. तिचा हा प्रवास सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Inspiring News : आधी पतीचा मृत्यू, नंतर आईचीही साथ सुटली, पण मनीषाने करुन दाखवलं! ही प्रेरणादायी गोष्ट वाचायलाच हवी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement