career in acting : तुम्हालाही व्हायचंय अभिनेता, मग 12 वी पासूनच याठिकाणी घ्या admission

Last Updated:
अनेकांना अभिनयात करिअर करायचे असते. मात्र, नेमकी माहिती त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांचं स्वप्न अपूर्ण राहते. तुम्हालाही अभियनात करिअर करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला अभिनयात करिअर करायचे असेल तर या महत्त्वाच्या इन्स्टिट्युटबाबत माहिती असणे महत्त्वाचे आहे. (अभिषेक तिवारी, प्रतिनिधी)
1/5
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही संस्था भारत सरकारद्वारे चालवली जाते. अभिनय आणि नाट्यक्षेत्रात शिक्षण देणारी एक भारतातील प्रमुख संस्था आहे. फक्त दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशातील ही सर्वोत्तम अभिनय शाळा आहे. येथे प्रवेश घेण्यापूर्वी तुम्हाला नॅशनल स्कूल ड्रामाची प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. दिल्लीतील मंडी हाऊस येथे ही संस्था आहे. याठिकाणी तीन वर्षांची फी फक्त 5000 रुपये आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही nsd.gov.in ला भेट देऊ शकता किंवा 011-23389402 / 23387916 वर कॉल करू शकता.

advertisement
2/5
मूनलाइट फिल्म्स आणि थिएटर स्टूडियो : हा स्टुडिओ अभिनय आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात उमेदवारांना कौशल्य प्रदान करण्यासाठी ओळखला जातो. विद्यार्थ्यांना याठिकाणी विस्तृत ज्ञान आणि व्यावहारिक अनुभव मिळतात. येथे बॉलीवूडचे सर्वात मोठे निर्माते महेश भट्ट स्वतः विद्यार्थ्यांना अभिनय आणि फिल्म मेकिंग शिकवतात. तुम्हीही येथे बारावीनंतर प्रवेश घेऊ शकता. ही संस्था दक्षिण दिल्लीतील कैलासच्या पूर्व भागात आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही www.moonlightfts.in ला भेट देऊ शकता किंवा 099106 81518 वर कॉल करू शकता.

3/5
श्री राम सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स : हे केंद्रही नेहमीच अभिनय, नृत्य आणि संगीतात विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट होण्यासाठी प्रोत्साहित करते. तुम्हीही येथे बारावीनंतर अनेक शॉर्ट टर्म कोर्स करू शकता. येथील कोर्सची फी 5000 रुपयांपासून सुरू होऊन 20000 रुपयांपर्यंत आहे. सर्व अभ्यासक्रमांचे शुल्क वेगवेगळे आहे. हे केंद्र मंडी हाऊसमध्ये आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही +91 95999 47637 वर कॉल करू शकता.

4/5
आरके फिल्म अँड मीडिया ॲकॅडमी : आपल्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठी आणि विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिकवण्यामुळे या अकादमीची विशेष ओळख आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना चित्रपट आणि मीडिया क्षेत्रासाठी अनोखेपणे तयार केले जाते. तुम्ही याठिकाणी बॅचलर डिग्री आणि डिप्लोमाही करू शकता. दिल्लीतील करोलबाग येथे ही संस्था आहे. येथे असलेल्या कोर्सची फी 30000 ते 175000 रुपयांपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही 09312237583 वर कॉल करू शकता.

5/5
बॅरी जॉन ॲक्टिंग स्टुडिओ : हा स्टुडिओ अभिनय क्षेत्रातील कौशल्य शिकवतो आणि विद्यार्थ्यांना अद्वितीयपणे तयार करतो. इथे अभिनयाचे अनेक कोर्सेस आहेत. यांची फी 50000 ते 200000 रुपये आहे. ही ॲक्टिंग स्कूल दक्षिण दिल्लीतील लाजपत नगरमध्ये आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही 09716114466 वर कॉल करू शकता किंवा www.bjas.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement