विश्वासघात! पतीची किडनी विकली, पैसे मिळताच पत्नी बाॅयफ्रेंडसोबत गेली पळून, 10 वर्षांच्या मुलीलाही सोडलं मागे..

Last Updated:

पश्चिम बंगालच्या हावडा येथे एका महिलेने पतीला फसवून त्याची किडनी विकली आणि 10 लाख रुपये घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. पत्नीने नवऱ्याला घर सुधारण्यासाठी किडनी विकण्यास भाग पाडले. मात्र, पैसे मिळताच ती प्रियकरासोबत पळाली. आता प्रकरण कोर्टात असून पोलीस तपास सुरू आहे.

AI Image
AI Image
आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आपण त्याची अपेक्षाही करत नाही आणि अशा समस्या आपल्या आवासून उभ्या राहतात. पश्चिम बंगालमधील हावडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबतही असंच काहीसं घडलंय. या व्यक्तीला त्याच्याच पत्नीने अशाप्रकारे फसवलंय की, तो अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही. घरची परिस्थिती सुधारवण्याच्या नावाखाली महिलेने आपल्या पतीची किडनी विकली आणि मिळालेले पैसे घेऊन पळून गेली.
पती-पत्नीचं नातं विश्वासावर आधारलेलं असतं, पण काही लोकं ते तोडण्यासाठी एक क्षणही वाया घालवत नाहीत. अशाच एका पत्नीने आपल्या पतीला अशा प्रकारे फसवलंय की, त्याला आयुष्यभर याचा पश्चाताप होईल. पत्नीच्या जाळ्यात अडकून, त्याने एक वर्ष आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधला आणि जेव्हा त्याला खरेदीदार मिळाला, तेव्हा त्याला त्याच्या किडनीचा एकही रुपयाही मिळाला नाही.
advertisement
पत्नीने पतीची किडनी विकली आणि प्रियकरासोबत पळून गेली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने आपल्या पतीला सांगितलं की, जर त्याने त्याची एक किडनी विकली, तर त्यांना इतके पैसे मिळतील की त्यांच्या घराची परिस्थिती सुधारेल. त्यांची 10 वर्षांची मुलगी मोठी होईल आणि तिचं शिक्षण चांगलं होईल, तसेच तिचं लग्नही चांगलं होईल. पत्नीच्या बोलण्यावर पतीचा विश्वास बसला आणि त्याने एक वर्ष आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधण्यात घालवलं. मानवी अवयव विकणं कायद्याचं उल्लंघन असल्यामुळे, त्याची किडनी 3 महिन्यांपूर्वी काळ्या बाजारात विकण्यात आली. त्याला 10 लाख रुपये मिळाले. इतका मोठा त्याग केल्यानंतर आपली फसवणूक होणार आहे, याची त्या व्यक्तीला कल्पनाही नव्हती.
advertisement
फेसबुकवरील प्रेमाने आयुष्य उद्ध्वस्त केले...
पतीने आरोप केला आहे की, त्याची पत्नी बराकपूरमध्ये राहणाऱ्या तिच्या प्रियकराला फेसबुकच्या माध्यमातून भेटली होती आणि दोघांनी मिळून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले. पतीने पोलिसांच्या मदतीने पत्नीला शोधलं आणि मुलीसोबत तिला परत आणायला गेला. कुटुंब समोर पाहून पत्नीने दरवाजा बंद केला आणि घटस्फोटाची धमकी देऊ लागली. पत्नीने पतीवर त्रास दिल्याचा आरोप करत घटस्फोट मागितला आहे. सध्या, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
विश्वासघात! पतीची किडनी विकली, पैसे मिळताच पत्नी बाॅयफ्रेंडसोबत गेली पळून, 10 वर्षांच्या मुलीलाही सोडलं मागे..
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement