advertisement

10 मुलांची आई, मैत्रिणीची मुलगी घरी आली तिला जाऊच दिलं नाही; 25 वर्षांनी अशा अवस्थेत सापडली

Last Updated:

Woman Captive Girl : आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलेच्या एका मुलाने गुप्तपणे पोलिसांना मुलीबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस आले. तिची अवस्था पाहून त्यांनाही धक्का बसला.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
आईची मैत्रीण म्हणजे मुलीची मावशी... माय मरो न मावशी जगो असं म्हणतात. कारण आईनंतर आईसारखं प्रेम कुणी करेल तर ती फक्त मावशी. पण एका महिलेने मात्र तिच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत इतकं भयानक कृत्य केलं की फक्त वाचूनच अंगावर काटा येईल. इंग्लंडमधील ही धक्कादायक घटना आहे.
ग्लॉस्टरशायर इथं राहणारी 56 वर्षांची अमांडा विक्सन, जिच्या घरी 25 वर्षांपूर्वी तिच्या मैत्रिणीची मुलगी एकटीच आली होती. पण तिने तिला पुन्हा जाऊच दिलं नाही आपल्याच घरात ठेवलं, ठेवलं काय कैद केलं, तब्बल 25 वर्षे तिने तिला घरातून बाहेरही पडू दिलं नाही. इतकी वर्षे महिलेने तिच्यासोबत जे केलं त्याची कल्पनाही कुणी केली नसेल.
advertisement
अमांडाला 10 मुलं होती. त्यामुळे तिने मैत्रिणीच्या मुलीला तिच्या घरात मोलकरीण म्हणून ठेवलं. जेणेकरून ती तिच्या मुलांची काळजी घेईल. त्यानंतर तिच्यासोबत नको नको तेच केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमांडाच्याच एका मुलाने गुप्तपणे पोलिसांना मुलीबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस तिला वाचवण्यासाठी आले.
advertisement
मुलगी खूपच वाईट स्थितीत होती. तिची अवस्था पाहून पोलीसही शॉक झाले. तिला आंघोळ करून एक वर्ष झालं होतं. ती खूप बारीक झाली होती, तिचा बेड पूर्णपणे घाणेरडा होता. अमांडा तिला दररोज झाडूने मारहाण करायची, तिच्या तोंडात साबणाचे पाणी ओतायची आणि चेहऱ्यावर ब्लीच लावायची, तिने तिचे दात तोडले, तिच्या मर्जीशिवाय तिचं मुंडणही केलं, डोक्यावरील सगळे केस काढून टाकले.
advertisement
न्यायालयाला सांगण्यात आलं की मुलीने बाहेर जाऊ नये म्हणून सर्व खिडक्या आणि दरवाजे  बंद करण्यात तर अमांडाच्या वकिलाने सांगितले की ती मुलगी स्वतः तिचं वाईट कुटुंब सोडून अमांडाकडे आली होती आणि तिने ही संपूर्ण कहाणी रचली होती.
1995 ते 2021 सालातील ही घटना आहे. ही मुलगी आता 40 वर्षांची झाली आहे आणि पोलिसांनी तिची सुटका केली आहे. अमांडावर जबरदस्तीने काम करायला लावणं, बंदिवासात ठेवणं आणि छळ करणं असे आरोप करण्यात आले आहेत.  डेली स्टार आणि स्काय न्यूजमधील वृत्तानुसार, अमांडाला सध्या सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणावर मार्चमध्ये सुनावणी होणार आहे, तेव्हा तिला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
10 मुलांची आई, मैत्रिणीची मुलगी घरी आली तिला जाऊच दिलं नाही; 25 वर्षांनी अशा अवस्थेत सापडली
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement