Buldhana: लिव्ह इन पार्टनर सोडून जाताच तरुणाचं टोकाचं पाऊल, इन्स्टावर VIDEO टाकला अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील दुसरं बीड परिसरात एका तरुणाने आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील दुसरं बीड परिसरात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित तरुणाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लिव्ह इन मध्ये राहणारी प्रेयसी अचानक सोडून गेल्याने तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान अटोळे असं आत्महत्या करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो गेल्या काही काळापासून आपल्या प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. सुरुवातीला काही दिवस त्यांच्यात सगळं काही सुरळीत सुरू होतं.
मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांत खटके उडू लागले होते. याच वादातून प्रेयसी काहीच न सांगता अचानक निघून गेली होती. प्रेयसी सोडून गेल्याने समाधानला नैराश्य आलं होतं. तिच्या विरहात व्याकूळ झाल्यानंतर त्याने अचानक टोकाचं पाऊल उचललं. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केली आहे.
advertisement
संबंधित व्हिडीओत समाधान डोक्यात बाटलीने स्वत:ला मारहाण करताना दिसत आहे. सुरुवातीला त्याने बाटलीने स्वत:ला मारून घेतल्यानंतर त्याने ऑन कॅमेरा विष प्राशन केलं. यानंतर काही वेळातच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका २५ वर्षांच्या तरुणाने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास केला जात आहे.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
March 21, 2025 2:35 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Buldhana: लिव्ह इन पार्टनर सोडून जाताच तरुणाचं टोकाचं पाऊल, इन्स्टावर VIDEO टाकला अन्...


