रात्री मेहुणीने बोलावलं दाजीला; म्हणाली, "हळूच घरातून बाहेर या", पुढे दोघांनी मिळून केला कांड; मोठ्या बहिणीची उडाली झोप

Last Updated:

बरेली येथे अजब प्रेमप्रकरण उघड झालं. एका मेहुणीचं प्रेम तिच्या दाजीवर म्हणजेच मोठ्या बहिणीच्या नवऱ्यावर जडलं. दोघंही गुपचूप घरातून पळून गेले. पीडितेच्या वडिलांनी...

Brother-in-law affair
Brother-in-law affair
प्रेम अशी गोष्ट असते की, स्त्री असो किंवा पुरूष काहीही करायला तयार होतात. समाज, नाती, नियम... सर्व काही बाजूला सारलं जातं आणि एकमेकांवरचं प्रेम अन् सोबत राहणं हेच अंतिम उद्दिष्ट प्रेमात ठरतं. त्यासाठी वाट्टेल ते धाडस करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. असंच एक विचित्र प्रेम प्रकरण उत्तर प्रदेशातून समोर आलं आहे. इथे धाकटी बहीण मोठ्या बहिण्याच्या नवऱ्यावर अर्थात दाजीवर प्रेम करू लागली. हे प्रेम इतकं वाढलं की, तिने हे विसरून गेली की हा माणूस तिच्याच बहिणीचा नवरा आहे. एकत्र राहण्यासाठी हे दोघे घरातून पळून गेले आणि त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. जेव्हा हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं, तेव्हा पोलिसही हैराण झाले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील शाही पोलीस स्टेशन परिसरात प्रेमाची एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. इथे एका महिलेचं लग्न 10 वर्षांपूर्वी रामपुर जिल्ह्यातील एका गावात झालं होतं. या महिलेला तीन मुलंही आहेत. पण कधी धाकट्या बहिणीचं मोठ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू झालं, हे कोणाला कळलंच नाही. दाजीचाही लहान मेहुणीवर जीव जडला. पण कुटुंबातील सदस्य त्यांच्यामध्ये अडथळा ठरत होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये रात्री पळून जायचं ठरलं. त्यानंतर दाजी आणि मेहुणी कोणालाही न सांगता, लपून-छपून घरातून पळून गेले. आता पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
advertisement
वडिलांची पोलिसांत तक्रार
मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितलं, "मी माझ्या मोठ्या मुलीचं लग्न 10 वर्षांपूर्वी केलं होतं. 24 मे रोजी माझा जावई घरी आला होता. तो सगळ्यांशी चांगला बोलत होता. त्यामुळे कोणालाही संशय आला नाही. रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेले. याच दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन जावयाने माझ्या 15 वर्षांच्या धाकट्या मुलीला पळवून नेलं. सकाळी जेव्हा सगळे उठले, तेव्हा जावई घरातून गायब होता. मुलगीही नव्हती. यानंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट झालं."
advertisement
पतीची चूक अन् शिक्षा पत्नीला
त्यांनी सांगितलं की, जेव्हा ते जावयाविरुद्ध तक्रार घेऊन त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा घरच्यांनी मोठ्या मुलीला धमकी द्यायला सुरुवात केली. यानंतर मुलीला मारहाण करून तिच्या तीन मुलींसह घरातून हाकलून देण्यात आलं. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी आणि त्याच्या मुलीचा शोध घेत आहेत. कारण दोघेही कुठेतरी पळून गेले आहेत. लवकरच दोघांना पकडून कुटुंबाच्या ताब्यात दिलं जाईल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
रात्री मेहुणीने बोलावलं दाजीला; म्हणाली, "हळूच घरातून बाहेर या", पुढे दोघांनी मिळून केला कांड; मोठ्या बहिणीची उडाली झोप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement