डायलॉग अडखळला अन् 'दशरथ' स्टेजवरच कोसळला, रामलीलेत अभिनेत्याच्या मृत्यूचा थरार कॅमेरात कैद

Last Updated:

Actor Death During Ramlila : रामलीला सादर करणाऱ्या अभिनेत्याचा चालू स्टेजवर शेवट झाला. रंगमंचावरील दशरथ सगळ्यांच्या डोळ्यांदेखत खाली कोसळला.

News18
News18
हिमाचल : नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. देशातील अनेक भागांमध्ये या दिवसात रामलीलाचं आयोजन केलं जातं. अनेक कलाकार या दिवसाची वाट पाहत असतात. एका ठिकाणी रामलीला सुरू होती पण तिथे धक्कादायक प्रकार घडला. रामलीला सादर करत असताना एक कलाकार स्टेजवरच कोसळला. रंगभूमीवरचं त्याने अखेरचा श्वास घेतला. सगळ्यांच्या डोळ्यांदेखत कलाकाराचा जीव गेला. कलाकाराच्या मृत्यूचा लाइव्ह थरार कॅमेरात कैद झाला आहे.
advertisement
चंबा मुख्यालयातील ऐतिहासिक रामलीलामध्ये दशरथाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ कलाकार अमरीश कुमार यांचे स्टेजवर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. स्टेज राजा दशरथाच्या दरबारात सजला होता. प्रेक्षक उत्साहाने नाटकाचा आनंद घेत असताना ही हृदयद्रावक घटना घडली. अमरीश कुमार आपले डायलॉग सादर करत होते, अचानक ते अडखळले आणि जमिनीवर पडले. काही क्षणातच रंगमंचावर गोंधळ उडाला आणि आयोजकांनी ताबडतोब पडदा पाडला आणि नाटक थांबवलं.  अमरीश यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
advertisement
चंबा जिल्ह्यातील रहिवासी असलेले अमरीश कुमार गेल्या 50 वर्षांपासून रामलीला स्टेजवर दशरथ आणि रावणाची भूमिका साकारत होते. त्यांच्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आणि दरवर्षी त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमत होते.
advertisement
रामलीला क्लबचे सदस्य सुदेश महाजन यांनी तीव्र शोक व्यक्त करताना म्हटलं की "हे आमच्यासाठी खूप दुःखद आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे. अमरीशजी केवळ एक कलाकार नव्हते तर रामलीलेचे आत्मा होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो."
advertisement
त्यांच्या निधनाने चंबा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. रामलीला क्लबने पुढील काही दिवसांसाठी सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चंबा रामलीला क्लबचे सदस्य सुदेश महाजन यांनी म्हटलं की, "या दुःखद घटनेने सर्वांना रंगमंचामागील कलाकारांच्या निष्ठा आणि समर्पणाच्या व्याप्तीवर विचार करण्यास भाग पाडले आहे. अमरीश महाजन त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगमंचावर आणि त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिक राहिले."
मराठी बातम्या/मनोरंजन/
डायलॉग अडखळला अन् 'दशरथ' स्टेजवरच कोसळला, रामलीलेत अभिनेत्याच्या मृत्यूचा थरार कॅमेरात कैद
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement