advertisement

Devoleena Bhattacharjee News: "किमान खाल्ल्या मिठाला तरी जागा रे..." खामेनींच्या निधनावर दु:ख व्यक्त करणाऱ्यांवर देवोलिना भट्टाचार्जी भडकली

Last Updated:

'साथ निभाना साथियाँ' फेम अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूवर भाष्य केले आहे.

actress devoleena bhattacharjee slams those who disrespect indian soldiers for expressing grief over ali khameneis death in iran israel war
actress devoleena bhattacharjee slams those who disrespect indian soldiers for expressing grief over ali khameneis death in iran israel war
'साथ निभाना साथियाँ' फेम अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने एका आंतरराष्ट्रीय प्रकरणावर सध्या तिने भाष्य केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची जगभरात चर्चा होत आहे. दरम्यान, देवोलिनाने इन्स्टास्टोरी शेअर करत या प्रकरणावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. जे भारतीय खामेनींच्या मृत्यूवर शोकव्यक्त करत आहेत, त्यांच्यावर टीका करत आहे.
शेअर केलेल्या इन्स्टास्टोरीमध्ये देवोलिना भट्टाचार्जीने लिहिलेय की, "तुम्ही लोकं म्हणतायत की, तुमचा (भारतासोबत) या देशासोबत काहीही संबंध नाही, तुम्हाला आमच्या देशातल्या सैनिकांचा अभिमान नाही, ते शहिद झाल्यावर त्यांच्याप्रती तुम्हाला दु:ख नाही, तुम्ही दहशतवादी हल्ल्याला 'षडयंत्र' म्हणतात, देश करत असलेल्या 'ऑपरेशन' या कारवाईला नाटक म्हणता, पीडित काहीही बोलत असल्यावर त्या गोष्टींना तुम्ही 'प्रोपगंडा' म्हणतात. पण तुम्ही जेव्हा देशाविरोधात उभे राहायची वेळ येते, तेव्हा पुढे मागे बिल्कुल पाहात नाहीत."
advertisement
देवोलिना भट्टाचार्जी पोस्टमध्ये काय म्हणाली?
"तुम्ही शत्रुंसाठी रडता आणि द्वेष करणाऱ्यांवर प्रेम करतात. जे तुमच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात, जे तुम्हाला वाचवतात तुम्ही त्यांच्याविरोधात बोलतात. जेव्हा तुम्ही देशाचे स्वातंत्र्य एन्जॉय करतात, तर ते तुम्हाला कोणाच्या बलिदानामुळे मिळाले आहे? इथे राहून, इथे पैसे कमावून, इथे पोटाची खळगी भरून आणि अगदी बिनधास्त श्वास घेता कारण तिथे सीमेवर आपल्या देशाचे कोणीतरी आपले रक्षण करत आहे. तरीही तुम्ही राष्ट्राच्या अखंडतेची खिल्ली उडवता? किमान तुम्ही या गोष्टींची खिल्ली उडवू नका."
advertisement
पोस्टच्या शेवटच्या भागामध्ये टिव्ही अभिनेत्रीने पोस्टामध्ये लिहिले की, "देशाच्या प्रत्येक धोरणाशी सहमत असण्याची गरज नाही. पण जर तुम्ही एखाद्याच्या बलिदानाची कदर करू शकत नसाल तर एकदा स्वत:च्या मनाला निष्ठेचा अर्थ आवर्जुन विचारा. ही राष्ट्रभक्ती नाही. आपल्या देशाच्या मातीचे रक्षण करणाऱ्यावरच चिखलफेक करणं चुकीचं आहे. किमान जागल्या मीठाला तरी जागा, ज्याचं मीठ खात आहात त्यासोबत तरी एकनिष्ठ राहा. देशद्रोही म्हणून जगण्यापेक्षा एकनिष्ठ व्यक्ती म्हणून श्वास घेणे लाख पटीने चांगले आहे."
advertisement
अभिनेत्रीच्या पोस्टला चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. देवोलिनाने तिच्या पोस्टमध्ये फरहाना भट्टवर नाव न घेता टीका केल्याचे अनेकांचे मत आहे. फरहानाने खामेनी यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आणि तेव्हापासून ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Devoleena Bhattacharjee News: "किमान खाल्ल्या मिठाला तरी जागा रे..." खामेनींच्या निधनावर दु:ख व्यक्त करणाऱ्यांवर देवोलिना भट्टाचार्जी भडकली
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement