Jhimma 2 नंतर पुन्हा एकत्र झळकणार सिद्धार्थ चांदेकर-सायली संजीव; नाना पाटेकर पाटेकरांसोबत शेअर करणार स्क्रीन

Last Updated:

झिम्मा च्या दोन्ही भागात सायली आणि सिद्धार्थने एकत्र काम केलं आहे. त्यानंतर आता दोघेही लवकरच एका नव्या सिनेमात झळकणार आहेत.

सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव
सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव
मुंबई, 11 डिसेंबर :  सध्या मराठी बॉक्स ऑफिसवर गाजत असलेला चित्रपट म्हणजे झिम्मा २. सध्या ऍनिमल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असला तरी झिम्मा २ त्यातही कमाई करत आहे. या चित्रपटाने आजवर 10 कोटींचा टप्पा पार करत सुपरहिटचा टॅग मिळवला आहे. या चित्रपटात सात बायकांच्या रियुनिअनची गोष्ट दाखवली आहे. यातील सगळ्या अभिनेत्री भाव खाऊन गेल्या असल्या तरी एका अभिनेत्यानं देखील सगळ्यांचं लक्ष वेधलं. झिम्मा 2  मध्ये दिसलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. त्याची या चित्रपटाच्या पहिल्या भागातील भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर आता या भागातही सिद्धार्थने मन जिंकलं आहे. झिम्मा 2 नंतर सिद्धार्थ लवकरच एका नव्या सिनेमात झळकणार आहे.
सिद्धार्थ चांदेकरने नुकतंच इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आपल्या अगामी चित्रपटाबाबत अपडेट दिली आहे. सिद्धार्थ लवकरच ‘ओले आले’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सिध्दार्थसोबत मुख्य अभिनेत्री म्हणुन सायली संजीव दिसणार आहे. झिम्मा च्या दोन्ही भागात सायली आणि सिद्धार्थने एकत्र काम केलं आहे. त्यानंतर आता दोघेही ‘ओले आले’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या ५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
advertisement
'सूर नवा ध्यास नवा' मधून 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्याची एक्झिट; बाहेर पडताच केलेली ती पोस्ट चर्चेत
सिद्धार्थ आणि सायली सोबत या चित्रपटात मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर देखील दिसणार आहेत. बऱ्याच दिवसांनी नाना एका मराठी चित्रपटात दिसणार असल्याने चाहते त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सिद्धार्थने नुकतंच ‘ओले आले’ चित्रपटातील नाना पाटेकरांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सिद्धार्थने लिहिलं, ‘आता बाप-मुलाच्या रोड ट्रीपचे काय? ओले आले! 5  जानेवारीपासून! जगुया झगामगा..!’ या पोस्टवरून ‘ओले आले’ चित्रपटात नाना पाटेकर सिद्धार्थ चांदेकरच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याचं समजत आहे.
advertisement
advertisement
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ चांदेकर, नाना पाटेकर व सायली संजीव रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेताना दिसून आले होते.तसेच चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. या पोस्टबरोबर ‘एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!’ असे कॅप्शनही दिलं आहे. हा चित्रपट नेमका कशाविषयी आहे, चित्रपटाची कथा काय असेल असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. त्यामुळेच आता या तिघांना एकत्र सिनेमात पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. 5 जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Jhimma 2 नंतर पुन्हा एकत्र झळकणार सिद्धार्थ चांदेकर-सायली संजीव; नाना पाटेकर पाटेकरांसोबत शेअर करणार स्क्रीन
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement