Akshay Kumar : ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; खिलाडीचा शॉकिंग खुलासा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Akshay Kumar : अक्षय कुमारची लेक नितारा कुमारला सायबर क्राईमचा सामना करावा लागला आहे.
Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची लेक नितारा कुमारला सायबर क्राईमचा सामना करावा लागला आहे. अनोळखी लोकांसोबत व्हिडीओ गेम खेळत असताना, त्यांच्यासोबत चॅटिंग करताना निताराला चांगलाच फटका बसलाय. व्हिडीओ गेम खेळताना समोरील व्यक्तीने निताराला थेट न्यूड फोटो पाठविण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे खिलाडी कुमारने थेट मुख्यमंत्र्यांकडे शाळेत सायबर क्राईमचा तास असावा, अशी मागणी केली आहे.
नेमकं काय झालं?
अक्षय कुमारची लेक नितारा एक अनोळखी लोकांसोबत एक व्हिडीओ गेम खेळत होती. या खेळादरम्यान काही वेळात समोरील व्यक्तीने तिच्यासोबत चॅट करायला सुरुवात केली. समोरच्या व्यक्तीने तिला कुठे राहतेस असं विचारलं? नितारानेही मुंबई असं उत्तर दिलं. त्यानंतर समोरुन तू स्त्री आहेस की पुरुष? असा प्रश्न विचारण्यात आला. तिनेही स्त्री असल्याचं उत्तर दिलं. पुढे समोरील व्यक्तीने निताराला थेट न्यूड फोटो पाठव तुझे, असा मेसेज आा. त्यानंतर मात्र नितारा सावध झाली. घडलेला प्रकार हा सायबर क्राईमचा भाग असल्याचं अक्षय कुमार म्हणाला.
advertisement
अक्षय कुमारची मुख्यमंत्र्यांना मागणी
अक्षय कुमार मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत म्हणाला,"शाळेत इतिहास, भूगोल, गणित शिकतो. त्यात 2+2=4 शिकतो. पण सायबर क्राईममध्ये 4 म्हणजेच 0 आहे. मी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करतो की, शाळेत सायबर क्राईमचा तास असावा".
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची लाडकी लेक नितारा कुमार 13 वर्षांची आहे. नितारी ही अक्षयची कार्बन कॉपी असल्याचं म्हटलं जातं. नितारा सध्या शाळेत असून मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. पण अनेकदा ती स्पॉट होत असते. आपल्या गोंडसपणाने ती चाहत्यांची मने जिंकून घेत असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 1:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Akshay Kumar : ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; खिलाडीचा शॉकिंग खुलासा