Alka Kubal: '...मुलींनी बापाचा मर्डर करायला हवा' संतापून हे काय म्हणाल्या अलका कुबल? वक्तव्य ऐकून अंगावर शहारे!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Alka Kubal: जळगावमध्ये 'खान्देश करिअर महोत्सव' कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी महिलांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर थेट आणि कठोर मत व्यक्त केलं.
मुंबई : जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर दहा एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान तीन दिवसीय खान्देश करियर महोत्सवाचं आयोजन करण्यात आला आहे. जळगावमध्ये 'खान्देश करिअर महोत्सव' कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी महिलांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर थेट आणि कठोर मत व्यक्त केलं.
काय म्हणाल्या अलका कुबल?
“जर एखादा बापच स्वतःच्या मुलीवर अत्याचार करत असेल, तर अशा बापाचा खून करायला हवा,” असा संतप्त सूर अलका कुबल यांनी लावला. त्यांचा रोष स्पष्ट होता. त्यांनी असेही सांगितले की महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील, तर आपल्या देशात बाकी देशांसारखे कडक कायदे आवश्यक आहेत. त्यांनी समाजातील वाढत्या विकृतीबाबत चिंता व्यक्त केली.
advertisement
महोत्सवामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या नृत्यसह तरुणींच्या ब्रायडल शोचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांचे सादरीकरणासह तरुणींच्या ब्रांडेड शोचं दरम्यान दिव्यांग विद्यार्थिनीं केलेल्या नृत्या ला बघून अलका कुबल याना अश्रु अनावर झाल. या महोत्सवा दरम्यान अलका कुबल यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
advertisement
यावेळी अलका कुबल यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यात कर्तृत्ववान तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान देखील करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांचा सुंदर असं नृत्य बघून भारावले त्यामुळे डोळे पानावले. खूप सुंदर डान्स दिव्यांग विद्यार्थ्यांनी केला तर ब्रायडल शो पाहून सुद्धा आनंद झाला. जळगाव मध्ये एवढं तरुणींचे चांगलं सौंदर्य आहे असे सुद्धा यावेळी अलका कुबल यांनी नमूद केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 11, 2025 5:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Alka Kubal: '...मुलींनी बापाचा मर्डर करायला हवा' संतापून हे काय म्हणाल्या अलका कुबल? वक्तव्य ऐकून अंगावर शहारे!









